आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Indian Opener Shikhar's Unique Style: Personal Cook Gets Angry After Asking For Leave, Posts Funny Video On Social Media

शिखर धवनचा अनोखा अंदाज:पर्सनल कुकने रजा मागितल्याने संतापला, सोशल मीडियावर पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिखर धवन हा टीम इंडियाचा सर्वात मजेदार खेळाडू मानला जातो. गब्बर इन्स्टाग्रामच्या रील व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना प्रत्येक वेळी मनोरंजन करून हसण्यास भाग पाडतो.

यावेळी शिखरने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या स्टाईलमध्ये त्याचा स्वयंपाकी कबीरला समजवण्याचा प्रयत्न केला, पण कूक रजेवर जाण्यासाठी ठाम होता. यावर शिखर त्याच्यावर चांगलाच रागावलेला दिसत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण

शिखर धवन त्याच्या फिटनेसबाबत खूप गंभीर आहे. याच कारणामुळे त्याचा वैयक्तिक कूक नेहमीच गब्बरसोबत असतो. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 ने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावेळी गब्बरसोबत त्याचा कूकही उपस्थित होता.

शिखरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखरचा स्वयंपाकी कबीर त्याला सोडून जात असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत कबीर स्वयंपाकाने त्याला सोडून जाऊ नये, यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून गब्बर त्याची विनवणी करताना दिसत आहे आहे.

शिखर जमिनीवर पडून म्हणतो की तुला जायचे असेल तर माझ्या मृतदेहावरून जा. यावरही कबीर स्वंयपाकी हा शिखरच्या शरीरीवरून त्याला ओलांडून निघून जाताना दिसत आहे. यानंतर गब्बरचा राग अनावर झाला. शिखरचे हे दृश्य पाहण्यासारखे आहे. यापूर्वीही तो असे मजेदार व्हिडिओ टाकताना दिसला आहे.

BCCI ने झिम्बाब्वेतील 3 वनडे सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. हा संघ 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान हा सामना खेळणार आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत. हे सामने ODI सुपर लीगचा भाग आहेत. झिम्बाब्वेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे कारण त्याचे गुण पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

शिखरच्या नेतृत्वाखाली 39 वर्षांनी क्लीन स्वीप

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली त्याने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. विंडीजमध्ये 39 वर्षांनंतर भारताला अशी कामगिरी करता आली आहे. संघाने या महिन्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत विश्वविजेत्या इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रणंद कृष्णा, मोहम्मद सिराज , दीपक चहर.

बातम्या आणखी आहेत...