आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:भारताचे खेळाडू दुबईमध्ये करू शकतात सराव; सहा आठवड्यांचे असेल शिबिर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषभ पंत व सुरेश रैनाने सराव सुरू केला. - Divya Marathi
ऋषभ पंत व सुरेश रैनाने सराव सुरू केला.
  • मुख्य करारातील खेळाडू असतील, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडले जाऊ शकतात

टीम इंडियाचे खेळाडू दुबईमध्ये जाऊन सराव करू शकतील. बीसीसीआय मुख्य करारात असलेल्या खेळाडूंचे दुबईत शिबिर आयोजित करू शकते. माहितीनुसार, यूएई आयपीएल आयोजनाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. अशात बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून शिबिराची योजना बनवत आहे. कोणत्याही मालिकेपूर्वी खेळाडूंचा किमान सहा आठवडे सराव झालेला असावा, असे संघ व्यवस्थापनाला वाटते.

या शिबिरात डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होऊ शकते, अशाच खेळाडूंचा सहभाग असेल. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी पहिलेच म्हटले आहे, गोलंदाजांना फिटनेस मिळवण्यासाठी किमान ६ आठवडे वेळ लागेल. सूत्रांनुसार, जर मुंबईमधील परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर, टी-२० लीग यूएईमध्ये होऊ शकते. त्यामुळे तेथे शिबिर आयोजनाची शक्यता आहे. जसे आयपीएलचे ठिकाण निश्चित झाल्यावर वेगाने घडामोडी होतील.

यादरम्यान, आयपीएल फ्रँचायझीला देखील वाटेल की, त्याचे खेळाडू शिबिरात सहभागी व्हावे. तसे पाहता बीसीसीआयसाठी दीर्घ काळातील शिबिर आयोजित करणे शक्य होणार नाही. अशात बीसीसीआय आयपीएलच्या शिबिरादरम्यान आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी आपला सपोर्ट स्टाफ पाठवू शकते.

इंग्लंडचा भारत दौरा स्थगित होऊ शकतो; पुढील वर्षी होईल मालिका

टीम इंडिया व इंग्लंड यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी ६ सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका स्थगित होऊ शकते. त्यासह न्यूझीलंड अ संघाचा पुढील महिन्यातील भारत दौरा रद्द होऊ शकतो. भारत व इंग्लंड यांच्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका प्रस्तावित आहे. मात्र, कोविड-१९ पाहता भारतात सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची शक्यता नाही. अशात १६ सप्टेंबरला इंग्लंड संघ भारतात येण्यावर शंका आहे. मात्र, बीसीसीआयकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बीसीसीआयच्या अॅपेक्स काैन्सिलच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत टीमच्या एफटीपी कँलेंडरवर चर्चा होईल. बीसीसीआय सध्या आयपीएलला महत्त्व देत आहे. जर टी-२० विश्वचषक पुढे ढकलला, तर सप्टेंबरमध्ये आयपीएल करण्याची त्यांची योजना आहे. अशात भारत-इंग्लंड मालिका जवळपास स्थगित असल्यात जमा आहे.

बातम्या आणखी आहेत...