आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विमिंग:विदेशात सराव सुरू; भारतामध्ये नुसतीच गाइडलाइनची घाेषणा; फाॅर्मात येण्यासाठी देशातील जलतरणपटूंना 6 महिने लागणार

भोपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचे स्विमर आॅलिम्पिकच्या उपांत्य फेरीतूनच बाहेर; अमेरिकनांचा दबदबा

कृष्णकुमार पांडेय 

लाॅकडाऊनमुळे दाेन महिन्यांपासून बंद असलेले भारतीय क्रीडा विश्व पूर्वपदावर यावे, यासाठी माेठा प्रयत्न सुरू आहे. अशातच गृह मंत्रालयाच्या वतीने नुकतीच देशभरातील स्टेडियम आणि स्पोर्ट॰स कॉम्प्लेक्स खुले करण्याची घाेषणा केली. यातून काही राज्यांनी यासाठी पुढाकार घेतला. मात्र, काही राज्यांमध्ये स्थानिक सरकारने अद्याप याबाबतचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युराेपात सध्या इव्हेंटच्या सरावाला सुरुवात झाली. यात जलतरणाचा समावेश आहे. युराेपात पूल खुले करण्याचीही परवानगी दिली आहे. भारतात मात्र गाइडलाइनच जाहीर केली. त्यामुळेच भारतातील खेळाडू अडचणीत सापडले आहेत.

फिटनेससाठी डाएट कमी करताहेत खेळाडू

भारताचा १०० मीटर फ्रीस्टाइलमधील सर्वात वेगवान जलतरणपटू वीरधवल खाडे सध्या वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने आपले ५० टक्के डाएट कमी केले. याशिवाय ताे फिटनेस कायम ठेवण्यासाठी घरीच याेगा आणि बाॅडी वेट ट्रेनिंग करत आहे. वीरधवल सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहे. तसेच इंदूरचा अद्वैत पागेही घरीच याेगा आणि कार्डिओ करत आहे.

फाेर्सकडून एसआेपी; “साई’ला पडला विसर

टास्क फाेर्सने आठवडाभरापूर्वीच जलतरणाच्या तयारीसाठीची स्टँडर्ड आॅपरेटिंग प्राेसिजर (एसआेपी) जाहीर केली. तसेच याची माहितीही साईला दिली आहे. मात्र, असे असतानाही साईला याचा विसर पडला. त्यामुळे जलतरणाच्या तयारीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय हाेऊ शकला नाही. ही एसआेपी तयार करण्यासाठी टास्क फाेर्सच्या वतीने आॅस्ट्रेलिया, युराेप आणि अमेरिकेतील कार्यपद्धतीचा अभ्यास केला.

पूलमध्ये लागण हाेण्याचा माेठा धाेका आहे. कारण, प्रत्येक जण मास्क लावून पूलमध्ये सराव करू शकत नाही. तसेच एकाच वेळी सर्व जण सराव करतात. त्यामुळे याचा माेठा धाेका आहे. -रजनीकांत श्रीवास्तव, वैज्ञानिक,आयसीएमआर

अनेक देशांत स्विमरला सरावासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, भारतात अद्याप हे झाले नाही. फेडरेशन यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, आम्हाला काेणताही प्रतिसाद मिळत नाही. - अमीन, डॉल्फिन अकादमीचे संचालक व माजी भारतीय कोच

शासनाने परिस्थिती लक्षात घेऊन आॅलिम्पिक काेटा मिळवलेल्या स्विमरला सरावाची परवानगी द्यावी. आम्ही साईला एसआेपी दिली आहे. त्यामुळे आता जूनमध्ये याला परवानगी मिळण्याची आशा आहे. -डी मोनल चोकसी, सचिव, भारतीय स्विमिंग फेडरेशन

- पूलमध्ये दाेन बीपीएम क्लाेरीन मेंटेन ठेवली जावी. वेगवेगळ्या भागात सॅम्पलिंग व टेस्टिंग करावी.

- एका लेनमध्ये एकच जलतरणपटू सराव करेल. त्याच्या बाजूला काही अंतरावर दुसराही सराव करू शकेल.

- स्विमिंग करताना खेळाडू वेगवेगळ्या गटर एरियात स्प्रिंट करेल. म्हणजे बाधेचा धाेका कमी हाेईल.

बातम्या आणखी आहेत...