आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान टीम इंडिया नव्या वर्षात नव्या नेतृत्व आणि प्रायाेजकासह आजपासून घरच्या मैदानावर मालिका विजयासाठी उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात हाेत आहे. मुंबईतील वानखेेडे स्टेडियमवर हे दाेन्ही संघ सलामीच्या सामन्यात समाेरासमाेर असतील. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. यादरम्यान भारतीय संघातील खेळाडूंच्या टी-शर्टवर आता क्लाेदिंग कंपनी किलर जीन्सच्या जाहिरातीचा लाेगाे दिसणार आहे. आता एमपीएलएेवजी या कंपनीचे प्रायाेजकत्वातून टीम इंडियाला पाठबळ असणार आहे.
भारतीय संघाचे घरच्या मैदानावर पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्ध पारडे जड मानले जात आहे. कारण, गत सात वर्षांपासून भारतीय संघाने एकाही टी-२० सामन्यात श्रीलंका टीमला विजय मिळवू दिला नाही. त्यामुळे श्रीलंका संघ सात वर्षांपासून भारतामध्ये टी-२० चा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, आताही या संघाची वाट खडतर मानली जात आहे. कारण, टीममध्ये सध्या अनुभवी खेळाडूंचा अभाव आहे. दुखापतीमुळे भारताच्या नियमित कर्णधार राेहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिककडे साेपवण्यात आली आहे. त्याच्याच नेतृत्वात आता फाॅर्मात असलेले मुकेश, शिवम व राहुल त्रिपाठी हे युवा खेळाडू सर्वाेत्तम खेळी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काेहलीसह भुवनेश्वर कुमार, राहुल व शमीलाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता टीम इंडिया नव्या चेहऱ्यांच्या बळावर मालिका विजयाची माेहीम फत्ते करण्यासाठी उत्सुक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.