आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडच्या प्रशिक्षकांचा काैतुकाचा वर्षाव:भारतीय संघाची कामगिरी दर्जेदार; स्मृती सर्वाेत्तम : लिसा

चंदीगड / गाैरव मारवाह16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला संघ सध्या फाॅर्मात आहे. टीमची यंदाच्या सत्रातील कामगिरी काैतुकास्पद ठरलेली आहे. संघातील युवा खेळाडू स्मृती मानधनासह शेफाली वर्माची फलंदजी लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे या संघाच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे, अशा शब्दांत यजमान इंग्लंड महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक लिसा केटली यांनी पाहुण्या भारतीय संघावर काैतुकाचा वर्षाव केला. याशिवाय त्यांनी भारताच्या युवा फलंदाज स्मृती आणि शेफालीच्या कामगिरीचेही खास काैतुक केले आहे. यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे.

भारतविरुद्ध मालिकेबद्दल काय वाटते?
दशकापासून भारतीय महिला संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावलेला आहे. त्यामुळे संघाची सामन्यागणिक विजयी माेहीम लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे या मालिकेदरम्यानही आमच्या संघाला तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाची नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीही काैतुकास्पद ठरली हाेती. या स्पर्धेत संघाने सर्वाेत्तम कामगिरी केली. संघातील जेमीमा व स्मृतीची कामगिरी सातत्याने उंचावत आहे.

लीग क्रिकेटमुळे महिलांना फायदा हाेईल?
भारतामध्ये पुढच्या वर्षी महिलांची आयपीएल हाेणार आहे. या लीगमुळे महिला क्रिकेटला वेगाने चालना मिळत आहे. त्याचा निश्चित असा माेठा फायदा आता महिला खेळाडूंना हाेणार आहे. इंग्लंडमध्येही लीगमुळे खेळाडूंना माेठा फायदा झाला आहे.

भारतविरुद्ध काेणते डावपेच?
भारतीय महिला संघाकडून राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आमच्या टीमचा पराभव झाला हाेता. यादरम्यान केलेल्या चुका आम्ही आता दूर केल्या आहेत. दुबळी बाजू अधिक मजबूत करण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे याच पराभवाची परतफेड करण्यासाठी आमचा संघ उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...