आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरचा पहिला टी-20:आजपासून भारतीय क्रिकेटचे नवे युग, नवे प्रशिक्षक व नव्या कर्णधारासह भारतीय संघाची पहिली मालिका

मुंबई / चंद्रेश नारायणन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत व न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना बुधवारी सायंकाळी ७ वाजेपासून खेळवला जाईल. न्यूझीलंड संघ चार वर्षांनी भारताच्या दौऱ्यावर आला. दोन्ही संघ १६ दिवसांनंतर पुन्हा एकदा टी-२० मध्ये समोरासमोर असतील. ३१ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला ८ गड्यांनी मात दिली होती. भारतीय संघाची न्यूझीलंड विरुद्ध कामगिरी अतिशय खराब राहिली आहे. गत वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर संघाने ३ एकदिवसीय सामने गमावले होते. त्यानंतर दोन कसोटी आणि पुन्हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दोन्ही संघांत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये अनोखा विक्रम आहे. दोन्ही संघ टी-२० मध्ये एकमेकांच्या घरात मजबूत आहेत. भारताने न्यूझीलंडमध्ये १० टी-२० खेळले, ज्यात ६ जिंकले व ४ गमावले. न्यूझीलंडने भारतात ६ सामने खेळले, ज्यात ३ जिंकले, २ गमावले.

ताकद : भारताची फलंदाजी आणि न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाचा सामना :
- भारताची ताकद फलंदाजी आहे. रोहित, सूर्यकुमार, राहुल, अय्यर, इशान, पंत सारख्या खेळाडूंवर फलंदाजीची मदार आहे, जी ब्लॅक कॅप्सची चिंता वाढवू शकते.
- न्यूझीलंडची ताकद त्यांचा अष्टपैलू खेळ आहे. त्यांच्याकडे अष्टपैलू, वेगवान गोलंदाज व चांगले स्ट्रायकर आहेत. विल्यम्सन व कॉन्वेच्या अनुपस्थितीत चॅममॅनला संधी मिळू शकते.

कमजोरी : गोलंदाजी दोन्ही संघांसाठी आहे चिंतेचा विषय
- भारताच्या वेगवान गोलंदाजीत अनुभवाची कमतरता आहे. अनुभवी भुवनेश्वर खराब फाॅर्मशी झगडत आहे. त्यांच्यात आत्मविश्वासही दिसत नाही. गोलंदाजीत वैविध्याचा पर्याय नसणे, हा देखील चिंतेचा विषय आहे.
- न्यूझीलंडपुढेही गोलंदाजीची समस्या आहे. फर्ग्युसन तंदुरुस्त नाही. बोल्टने काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. विश्वचषकानंतर ईश सोढी व सेंटनरच्या आत्मविश्वासाबाबत काही सांगता येणार नाही.

नवे प्रशिक्षक व नव्या कर्णधारासह भारतीय संघाची पहिली मालिका
बुधवारपासून भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाला सुरुवात होईल. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नवा टी-२० कर्णधार रोहित शर्मासोबत भारतीय संघाची पहिली टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका असेल. जयपूरच्या सवाई मानसिंग (एसएमएस) स्टेडियम क्रिकेटची नवी पटकथा लिहिण्यास तयार आहे. या मैदानावरील हा पहिला टी-२० सामना असेल. कोरोनानंतर प्रथमच १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत देशातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना होईल. हा जयपूरमध्ये आठ वर्षांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना रंगेल. हा प्रसंग खास बनवण्यासाठी दिव्य मराठीने आपल्या वाचकांसाठी जयपूरमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनकडून लिहिले आहे. अझरुद्दीनने पाकिस्तान विरुद्ध १९८७ मध्ये येथे खेळलेल्या एकमेव कसोटीत शतक झळकावले होते. अजहरने दुबईतून दिव्य मराठीसाठी या विशेष क्षणी लिहिले आहे ...

द्रविडच्या मार्गदर्शनात भारतीय संघ नवीन पटकथा लिहिणार; थोडा वेळ द्यावा लागेल
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ नवीन पटकथा लिहिण्यास तयार आहे, त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. गेल्या ४-५ वर्षांपासून तो कनिष्ठ खेळाडूंसोबत ज्या प्रकारे काम करत होता आणि त्यातील बहुतांश खेळाडू आता वरिष्ठ संघात आहेत, त्यामुळे त्याला संघासोबत काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. होय, त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. द्रविडकडे भारतीय संघाची जबाबदारी देण्याचा बीसीसीआयचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. मात्र, रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी भारतीय संघासोबत चांगली कामगिरी केली. चांगला निकालदेखील दिला. विदेशात देखील संघाला यश मिळाले. मात्र, संघ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यांची कमतरता जाणवते.

लाल चेंडू व पांढऱ्या चेंडूचा कर्णधार वेगळा असावा
भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात टी-२० चा नवा कर्णधार मिळाला. त्याच्या नेतृत्वात भारत नवीन सुरुवात करेल. आयपीएलमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले. तसे पाहिल्यास, मी नेहमी लाल चेंडू व पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या कर्णधाराचे समर्थन करतो. बीसीसीआयने ही एक चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे कामाचा ताण थोडा कमी होईल. पांढरा चेंडू आणि लाल चेंडूवरील क्रिकेटच्या खेळाडूंनीही आता मंडळाने आणि निवडकर्त्यांना चिन्हांकित करणे आवश्यक आहे.

घरच्या वातावरणाचा फायदा भारताला मिळणार
भारतीय संघ टी-२० विश्वचषकानंतर एकप्रकारे नवी सुरुवात करेल. भारतीय संघाला घरच्या वातावरणाचा निश्चित फायदा मिळेल. विश्वचषकातील फायनलिस्ट विरुद्ध खेळण्याचा कुठलाही दबाव भारतावर नसेल. पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांसोबत भारत खेळेल. त्याचा मोठा परिणाम होईल. भारत सलग तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचून देखील आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही.

१९८७ मध्ये जयपूरची एकमेव कसोटी वैशिष्ट्यपूर्ण
१९८७ मध्ये जयपूरमध्ये खेळली गेलेली कसोटी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्या सामन्यात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल झिया उल हकही आले होते. होय, मला आठवते की, मी त्यासाठी शतक झळकावले होते. मी त्यापूर्वीही या मैदानावर खेळलो होतो. भारताकडून त्या सामन्यात रवी शास्त्रीने देखील शतक ठोकले होते. अतिशय सुंदर वातावरण होते. जयपूरचे क्रिकेटप्रेमी खूप उत्साहित असतात. मी जेव्हा ३४ वर्षांपूर्वी येथे शतक झळकावले होते आणि आता तेथील खेळपट्टीत मोठा बदल झाला असेल. मात्र, प्रेक्षकांच्या उत्साहात कुठलीही कमी नसेल व ते अधिक उत्साहाने क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देतील, हे निश्चित.

बातम्या आणखी आहेत...