आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Indian Women's Highest Score Against Australia, India's First Innings Declared At 377 For 8, Australia's 143 For 4

पिंक बाॅल कसाेटी:ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाची सर्वाधिक धावसंख्या नाेंद, भारताचा पहिला डाव 8 बाद 377 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 143 धावा

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र (पिंक बाॅल) कसोटीवर आपली पकड मिळवली. पाऊस व खराब प्रकाशमानामुळे सुरुवातीचे दोन दिवस दिवसाचा पूर्ण खेळ होऊ शकला नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी १०३ षटके झाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ८ बाद ३७७ धावांवर डाव घोषित केला. ही भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली. तिसऱ्या दिवशी भारताने ५ बाद २७६ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. दीप्ती शर्माने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तिचे हे कसोटीतील पहिले अर्धशतक ठरले. कॅम्पबेलने तिला पायचीत केले. तानियाने २२ व पूजाने १३ धावा जोडल्या. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६० षटकांत ४ गडी गमावत १४३ धावा केल्या.

अाॅस्ट्रेलियाची एलिसे पॅरी (२७) व गार्डनर (१३) खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडे अद्याप २३४ धावांची आघाडी आहे. बेथ मुनीला (४) सातव्या षटकात झुलनने बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. दुसऱ्या गड्यासाठी एलिसा हिलीने कर्णधार मेग लेनिंगसह ४९ धावांची भागीदारी रचली. अनुभवी गाेलंदाज झुलन गाेस्वामीने हिलीला २३ व्या षटकात तानियाच्या हाती झेल देत बाद केले.

बातम्या आणखी आहेत...