आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारी-मार्चदरम्यान विदेशी संघ दाैऱ्यावर:भारताचे 90 दिवसांत 19 सामने; नागपूर, पुणे, मुंबईत आयाेजन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेश संघाविरुद्ध मालिका पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता आगामी वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी कसून मेहनत घेणार आहे. यासाठी टीम इंडिया पुढच्या वर्षी आपल्या वनडे विश्वचषकाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करणार आहे. भारतीय संघ जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल १९ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये ९ वनडे, ६ टी-२० आणि ४ कसाेटी सामन्यांचा समावेश आहे. यादरम्यान भारतीय संघ न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध मालिका खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी ९० दिवसांतील वनडे, टी-२० आणि कसाेटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसाेटी सामन्यांची बाॅर्डर-गावसकर कसाेटी मालिका खेळवली जाणार आे. त्यानंतर हे दाेन्ही संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत समाेरासमाेर असतील. हे दाेन्ही संघ ९ फेब्रुवारीपासून नागपूरच्या मैदानावर सलामीच्या कसाेटीत खेळतील. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून दुसरी कसाेटी दिल्ली व तिसरी कसाेटी १ मार्चपासून धर्मशालामध्ये हाेणार आहे. १७, १९ व २२ मार्चदरम्यान अनुक्रमे मुंबई, विशाखापट्टणम व चेन्नईत वनडे खेळवले जातील.

ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड टीमचा भारत दाैरा : जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ भारत दाैरा करणार आहे. येत्या ३ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२०, वनडे मालिकेला सुरुवात हाेणार आहे. ही मालिका १५ जानेवारीपर्यंत रंगणार आहे. मुंबई, पुणे, राजकाेटमध्ये टी-२० चे सामने हाेतील. गुवाहाटी, काेलकाता, तिरुवंनतपुरममध्ये वनडे मालिका हाेणार आहे. त्यानतर १८ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात प्रत्येकी ३ वनडे, टी-२० सामन्यांची मालिका हाेणार आहे. याचे सामने हैदराबाद, रायपूर, इंदूर (वनडे), रांची, लखनऊ, हैदराबादमध्ये (टी-२०) सामने हाेतील.

बातम्या आणखी आहेत...