आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India's Disappointment In Women's World Cup: England Won By 4 Wickets, Charlotte Dean Who Took 4 Wickets Became The Man Of The Match | Marathi News

महिला विश्वचषकात भारताची निराशा:इंग्लंडने 4 गडी राखून केला पराभव, 4 बळी घेणारी शार्लोट डीन ठरली सामनावीर

नवी दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 गडी राखून मात केली. इंग्लंडसमोर 135 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 31.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. विजयात नाबाद 53 धावा करणाऱ्या कर्णधार हीदर नाइटने सर्वाधिक धावा केल्या. या स्पर्धेत सलग तीन पराभवानंतर गतविजेत्या इंग्लंडचा हा पहिला विजय आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला केवळ 135 धावा करता आल्या, भारतीय संघ 36.2 षटकांत सर्वबाद झाला. स्मृती मानधना (35) हिने सर्वाधिक धावा केल्या तर रिचा घोषने 33 धावा केल्या. इंग्लंडकडून शार्लोट डीनने सर्वाधिक 4 बळी घेतले.

टीम इंडियाचा दुसरा पराभव
भारतीय संघाचा चालू स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. इंग्लंडपूर्वी न्यूझीलंडने भारताचा ६२ धावांनी पराभव केला होता. 4 सामन्यापैकी टीम इंडियाने 2 सामने जिंकले आहेत तर 2 सामन्यात संघाला परभव पत्करावा लागला. संघ अजूनही 4 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यासोबतच इंग्लंडचा संघ 4 सामन्यापैकी एक सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आला आहे.

हरमनला दुखापत

इंग्लंडच्या डावादरम्यान 31 व्या षटकात उपकर्णधार हरमनप्रीत कौरला दुखापत झाली. 30.5 व्या षटकात, सोफिया एक्लस्टनने झुलन गोस्वामीच्या चेंडूवर एक फ्लिक शॉट खेळला आणि मिड-ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या हरमनला चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. हरमनला गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर डॉक्टरांनी मैदानातून आधार देऊन तीना बाहेर नेले.

मेघनाची मेहनत गेली वाया
या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मेघना सिंगने शानदार गोलंदाजी करताना 21 धावांत 3 बळी घेतले. इंग्लंडच्या डावाच्या 29 व्या षटकात तीन चेंडूंत दोन खेळाडू बाद झाले. 29.1 षटकात मेघनाने सोफिया डंकले (17) यष्टिरक्षक रिशा घोषकडे झेलबाद केले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कॅथरीन ब्रंटला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या कामगिरीनंतरही ती भारताला जिंकवू शकली नाही.

झुलनने रचला इतिहास
भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामी हिने इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी झुलन पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तीने इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्युमॉन्टला (1) LBW बाद करून ही कामगिरी केली. ब्युमॉंट बाद झाल्यानंतर इंग्लंडने दुसरी विकेटही गमावली. टॅमीला अंपायरने नॉट-आऊट दिले, पण भारतीय कर्णधार मिताली राजने रिव्ह्यू घेतला, बॉल ऑफ-स्टंपला लागल्याचे रिप्लेत दिसून आले.

यानंतर नाइट आणि नताली स्कायव्हर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 चेंडूत 65 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडचा संघ पुन्हा मजबूत झाला. पूजा वस्त्राकरने नतालीला (45) बाद करून ही भागीदारी फोडली. राजेश्वरी गायकवाडने एमी जोन्सला (10) बाद करून इंग्लंडला चौथा धक्का दिला. हरमनप्रीत कौरने मिडऑनला एमीचा उत्कृष्ट झेल टिपला.

मेघनाने घेतली पहिली विकेट
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि मेघना सिंगने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डॅनियल व्याटची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. स्नेह राणाने पहिल्या स्लीपमध्ये अप्रतिम डाईव्ह मारत व्याटचा झेल टिपला.

ऋचा आणि झुलनने ओलांडला 100 धावांचा टप्पा

भारताची 7वी विकेट पूजा वस्त्राकरच्या रूपाने पडली. पूजाने 9 चेंडूंत 6 धावा केल्या आणि तिला शार्लोट डीनने एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर ऋचा घोष आणि झुलन गोस्वामी यांनी 8व्या विकेटसाठी 52 चेंडूंत 37 धावांची भागीदारी केली. 34 षटकांमध्ये झुलनने मिडविकेटच्या दिशेने हलक्या हाताने शॉट खेळला आणि रिचा नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी धाव काढण्यासाठी धावली. झुलनने नकार दिल्यानंतर ती पुन्हा क्रीझकडे धावली, पण नताली सायव्हरच्या थेट थ्रोमुळे तिची विकेट गेली. ती 56 चेंडूंत 33 धावा करून बाद झाली.

पुढच्याच षटकात झुलन गोस्वामी (20)ही पॅव्हेलियनमध्ये परतली. तिची विकेट केट क्रॉसच्या खात्यात आली.

  • भारताच्या 6 खेळाडू सिंगल डिजिटमध्ये बाद झाल्या.
  • भारतीय संघाची (१३४) या विश्वचषकात ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
  • शार्लोट डीनने दुसऱ्यांदा वनडे डावात चार विकेट घेतल्या.
  • डीनची वनडेतील ही (4/23) सर्वोत्तम कामगिरी आहे.

मंधाना पायचीत

टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला तो स्मृती मंधानाच्या विकेटमुळे. स्मृतीने 58 चेंडूंत 35 धावा केल्या आणि तिला सोफी एक्लेस्टनने एलबीडब्ल्यू आऊट केले. मंधानाने पंचांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन रिव्ह्यू घेतला, पण रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नव्हता, चेंडू विकेटला आदळत होता. भारताने 71 धावांवर सहावी विकेट गमावली.

शार्लोट डीनचे एका षटकात 2 बळी

28 धावांवर पहिल्या 3 विकेट गमावल्यानंतर, स्मृती मंधना आणि हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी 50 चेंडूंत 33 धावा जोडून भारतीय डावाला पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. ऑफस्पिनर शार्लोट डीनने हरमनला (14) बाद करून टीम इंडियाला पुन्हा धक्का दिला तेव्हा ही जोडी लक्ष वेधून घेत होती. त्याच षटकातील दोन चेंडूंनंतर स्नेह राणाला (0) बाद करून डीनने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हरमन आणि स्नेहला यष्टिरक्षक एमी जोन्सने झेलबाद केले.

बातम्या आणखी आहेत...