आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India's ODI, T20, Test Squad For Australia Tour Announced; Opportunity For Four Young Fast Bowlers Including Varun Chakraborty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी-20, कसोटी संघाची घोषणा; वरुण चक्रवर्तीसह चार युवा वेगवान गोलंदाजांना संधी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोव्हेंबरमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, तीन वनडे, टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची असणार मालिका

आयपीएलमधील सामन्यात बळींचा पंच मारणाऱ्या युवा गोलंदाज वरुण चक्रवर्तीला आता आंतरराष्ट्रीय दाैऱ्यातही अव्वल कामगिरी करण्याची संधी आहे. त्याची आगामी नाेव्हेंबर महिन्यातील ऑस्ट्रेलिया दाैऱ्यासाठी भारताच्या टी-२० संघामध्ये निवड झाली आहे. आयपीएलमधील लक्षवेधी कामगिरी ही त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. वरुणसह निवड समितीने चार युवा वेगवान गोलंदाजांना दाैऱ्यावरील संघात संधी दिली आहे.

भारतीय संघ नाेव्हेंबरमध्ये प्रत्येकी तीन वनडे, टी-२० आणि चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दाैरा करणार आहे. याच दाैऱ्यासाठी मंगळवारी भारताच्या या तिन्ही संघांची घोषणा करण्यात आली. काेहलीच्या कणखर नेतृत्वात भारताचे हे तिन्ही संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले नशीब आजमावणार आहेत. आयपीएलमध्ये सरस कामगिरी करणाऱ्या युवांंना या दाैऱ्यातही वेगळी खेळी करता येईल.

असे आहेत संघ

कसाेटी : विराट कोहली (कर्णधार) मयंक, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, रहाणे, विहारी, शुभमान गिल, साहा (उपकर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, शमी, उमेश यादव , नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अश्विन, माे. सिराज.

वनडे : कोहली (कर्णधार), धवन, शुभमान गिल, लाेकेश राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक, मयंक , रवींद्र जडेजा, चहल, कुलदीप यादव, बुमराह, शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

टी- 20 : काेहली (कर्णधार), धवन, मयंक, राहुल (उपकर्णधार), अय्यर, मनीष, हार्दिक, सॅमसन, जडेजा, सुंदर, चहल, बुमराह, शमी, नवदीप सैनी, चाहर, वरुण चक्रवर्ती.

बातम्या आणखी आहेत...