आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India's Tour Of Sri Lanka In August; The BCCI Will Take Further Decision With The Permission Of The Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:भारताचा श्रीलंका दौरा ऑगस्टमध्ये; बीसीसीआय सरकारच्या परवानगीनंतर घेणार पुढील निर्णय

मुंबई9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दोन्ही संघ तीन वनडे, तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार

बीसीसीआय सरकारच्या परवानगीनंतर ऑगस्टमध्ये श्रीलंकेबाबत अंतिम निर्णय घेईल. दोन्ही संघांत ३ वनडे व ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाऊ शकते. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, दोन महिने बाकी असून आताच प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल. भारताला याच महिन्यात दौऱ्यावर जायचे हाेते, मात्र कोरोनामुळे स्थगित करण्यात आले. श्रीलंकन माध्यमानुसार, बीसीसीआयने क्रिकेट श्रीलंकेला हीदेखील माहिती दिली की, जर मालिका होणार असेल तर ३० ते ४० टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अंतिम निर्णय होईल. श्रीलंकन खेळाडूंनी कोरोनानंतर मैदानावर पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंना अद्याप सरावाची परवानगी मिळालेली नाही.

यादरम्यान, ब्लॅक लाइव्हज प्रकरणाच्या आंदोलनामुळे आयसीसी आपल्या प्लेइंग कोडमध्ये सूट देऊ शकतो. अमेरिकेत कृष्णवर्णीयाच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या आंदोलनाला फुटबॉलपटू मैदानात समर्थन करताना दिसतायत. आयसीसीच्या नियमानुसार, कोणताही खेळाडू किंवा अधिकारी आपल्या कपड्यावर, साहित्यावर कोणताही वैयक्तिक संदेश देऊ शकत नाही. २०१९ मध्ये विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर बलिदान बॅज हटवण्यात आला होता. इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यात जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. कसोटी मालिकेत खेळाडू आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...