आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 मालिका:भारताची विजयी सलामी,  जेमीमा सामनावीर; उद्या सामना

दांबुलाएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार हरमनप्रीत काैरने आपल्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाची श्रीलंकेविरुद्ध असलेली विजयी मोहीम कायम ठेवली. यातून भारताने श्रीलंकेवर सलग ११ वा विजय संपादन केला. भारतीय महिला संघाने गुरुवारी सलामीच्या टी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेवर मात केली. भारताने ३४ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. महाराष्ट्राची जेमिमा राॅड्रिग्ज ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. भारतीय संघाची नजर मालिका विजयावर लागली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना उद्या शनिवारी याच मैदानावर रंगणार आहे. नाणेफेक जिंकून प्र‌थम फलंदाजीत भारतीय महिला संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात श्रीलंकेसमोर १३९ धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाला ५ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारू शकला.

बातम्या आणखी आहेत...