आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IndiaVs Sri Lanka 3rd T20 LIVE Score; Latest Update; India Tour Of Sri Lanka Live Update | Ruturaj Gaikwad, Devdutt Padikkal, Nitish Rana, Chetan Sakariya; News And Live Updates

भारत V/S श्रीलंका:यजमान श्रीलंकेने पहिल्यांदाच भारतीय संघाविरुद्ध जिंकली टी-20 मालिका; भारतावर 7 गड्यांनी मात; हसरंगा ठरला मालिकावीर व सामनावीर

कोलंबो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.

यजमान श्रीलंका क्रिकेट संघाने वानिंदू हसरंगाच्या (4/9) धारदार गाेलंदाजीच्या बळावर घरच्या मैदानावर गुरुवारी भारतीय संघावर एेतिहासिक मालिका विजय संपादन केला. श्रीलंकेने पहिल्यांदाच भारताविरुद्धची टी-20 मालिका जिंकली. श्रीलंका टीमने तिसऱ्या सामन्यात भारतावर 7 गड्यांनी मात केली. यासह श्रीलंका संघाला तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने अापल्या नावे केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 बाद 81 धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 14.3 षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. भानुका (18), धनंजया डिसिल्व्हा (नाबाद 23) अाणि वानिंदू हसरंगा (नाबाद 14) यांनी श्रीलंकेच्या मालिका विजयात माेलाचे याेगदान दिले. अष्टपैलु खेळी करणारा हसरंगा हा मालिकावीर व सामनावीर ठरला.

तिसऱ्या सामन्यातील सुमार फलंदाजीमुळे शिखर धवनचा अापल्या नेतृत्वात भारताला सलग दुसरी मालिका जिंकून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याच्या नव्या नेतृत्वात भारताने गत अाठवड्यात यजमान श्रीलंका टीमविरुद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका जिंकली.

राहुल चहरचे तीन बळी; संदीप वाॅरियरचे पदार्पण
भारतीय संघाकडून युवा गाेलंदाज संदीप वाॅरियरने टी-20 मध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला विकेट मिळाली नाही. राहुल चहरने तीन बळी घेतले.

कर्णधार आणि सॅमसन शून्यावर बाद
भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन आणि संजू सॅमसन यांना खातेही उघडता आले नाही. तर दुसरीकडे, देवदत्त पाडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड फारसे कामगिरी करू शकले नाहीत. दरम्यान, सध्या भारताचे पाचही फलंदाज बाद झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ मोठी धावसंख्या उभी न करु शकल्यास त्यांचा पराभवाची शक्यता आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने 3 गडी बाद केले आहे.

भारत आणि श्रीलंका मध्ये 1-1 बदल
भारत आणि श्रीलंकेच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दोन्ही संघाने 1-1 बदल केले आहेत. दरम्यान, भारतीय संघ 5 फलंदाज आणि 6 गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. वेगवान गोलंदाज संदीप वारियरची डेब्यू कॅप मिळाली असून जखमी नवदीप सैनीच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने संघात बदल केले आहे. वेगवान गोलंदाज इसुरु उदानाच्या जागी पाथुम निशांकाचा संघात समावेश करण्यात आला आहे. 3 सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.

दोन्ही संघ

भारत - शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पद्धिकल, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, संदीप वारियर, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

श्रीलंका - दासुन शनाका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), धनंजय डी सिल्व्हा, सदारा समरविक्रम, रमेश मेंडिस, वनिंदू हसरंगा, चमिका करुणरत्ने, पाथूम निसानका, अकिला धनंजय आणि दुशमंत चामिरा.

बातम्या आणखी आहेत...