आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Roach's Storm Bowling: West Indies Close To Victory, Now Need Just 35 Runs, Bangladesh's Second Innings At 245

रोच ची तुफान गोलंदाजी:वेस्ट इंडिज विजयाच्या जवळ, आता फक्त 35 धावांची गरज, बांगलादेशचा दुसरा डाव 245 धावांवर

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केमार रोच ( 53/5) आणि अल्झारी जोसेफ (55/3) यांच्या अचूक गोलंदाजीने बांगलादेश दौऱ्यातील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान वेस्ट इंडिजला विजयाच्या जवळ नेले. विंडीजला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात यजमानांना विजयासाठी 84 धावांचे लक्ष्य मिळाले होते. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

खालिद अहमदने वेस्ट इंडिजला पहिले तीन धक्के दिले.
खालिद अहमदने वेस्ट इंडिजला पहिले तीन धक्के दिले.

वेस्ट इंडिजला सुरुवातीचे धक्के, कॅम्पबेल-ब्लॅकवुडने सावरले

बांगलादेशच्या 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 बाद 49 धावा केल्या होत्या. जर्मेन ब्लॅकवूड (17) सलामीवीर जॉन कॅम्पबेलसह (28) नाबाद परतला.

पहिल्या चार षटकांत संघाने 9 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी बांगलादेशी गोलंदाज मोठा बदल घडवू शकतील असे वाटत होते, पण त्यानंतर कॅम्पबेल आणि ब्लॅकवुड यांनी क्रीझवर उतरून दिवसअखेरपर्यंत एकही विकेट पडू दिली नाही. बांगलादेशकडून खालिद अहमदने या तीन विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात नुरुल हसन शॉट खेळताना.
दुसऱ्या डावात नुरुल हसन शॉट खेळताना.

साकिब आणि नुरुलचे अर्धशतक

बांगलादेश संघाने 2 बाद 50 धावा करत दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर मोठी धावसंख्या करून सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती. कारण सामन्याला तीन दिवस बाकी होते. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या डावात 103 धावांवर बाद झालेल्या संघाला दुसऱ्या डावात केवळ 245 धावा करता आल्या. त्याच्याकडून केवळ कर्णधार शकिब अल हसन (63) आणि यष्टिरक्षक नुरुल हसन (64) पन्नास धावा करू शकले.

संघाने एकवेळ 109 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र या दोन खेळाडूंच्या शतकी भागीदारीमुळे संघाची लाज वाचली. सलामीवीर तमिम इक्बाल 22 आणि महमुदुल हसन 42 धावांवर बाद झाला.

अल्झारी जोसेफने तीन फलंदाजांना माघारी धाडले.
अल्झारी जोसेफने तीन फलंदाजांना माघारी धाडले.

जोसेफ सोबत रोच देखील प्रभावी

केमार रोच आणि अल्झारी जोसेफ यजमानांसाठी प्रभावी गोलंदाज ठरले. रोचने दुसऱ्या डावात 5 बळी घेत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. रोचच्या या पाच विकेट्समध्ये कर्णधार शकीबसह नुरुलच्या विकेटचा समावेश होता. याशिवाय अल्झारी जोसेफला 3 आणि मेयर्सला 2 यश मिळाले.

बातम्या आणखी आहेत...