आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Inshaat Sharma's Coach Shravan Kumar Says Inshaat Will Play 40 More Tests, Can Break Kapil Dev's Record

मुलाखत:इंशात शर्माचे प्रशिक्षक श्रवण कुमार म्हणाले - इंशात आणखी 40 कसोटी सामने खेळेल, तोडू शकतो कपिल देवचा विक्रम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविणे इशांतसाठी मोठे आव्हानात्मक

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इंशात शर्माने कसोटी कारकिर्दीतील 300 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. डॅनियल लॉरेन्स त्याचा 300 वा बळी ठरला. इशांतचे प्रशिक्षक श्रावण कुमार यांना या कामगिरीचा खूप अभिमान आहे. इंशात अद्याप थांबणार नाही असेही ते म्हणाले.

श्रवण यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, इंशात कसोटी क्रिकेटमध्ये कपील देव ला मागे टाकत सर्वाधिक गडी बाद करणाला भारतीय वेगवान गोलंदाज बनणार आहे. इंशात केवळ 32 वर्षांचा आहे आणि किमान 40 कसोटी सामने खेळू शकतो. कपिल देव यांच्या नावावर 434 विकेट्स आहेत.

चूक स्वीकारणे इशांतचे वैशिष्ट्य आहे

श्रवण कुमार म्हणाले की, 'इशांतची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपली चूक स्वीकारणे माहित आहे. तसेच तो आपली चूक सुधारण्यासाठी परिश्रम देखील करतो. जेव्हा त्याला खराब प्रदर्शनामुळे संघातून काढले होते, तेव्हा तो माझ्याकडे आला आणि माझ्याशी बोलला. त्याची गोलंदाजीची अॅक्शन पूर्वीसारखी नसल्याचे मी त्याला सांगितले. त्यानंतर त्याने त्यावर काही दिवस काम केले आणि पुन्हा संघात पुनरागमन केले.'

इशांतला तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावे लागेल

प्रशिक्षक म्हणाले की, 'इशांतला स्वत: ला तंदुरुस्त ठेवावं लागेल आणि सतत चांगली कामगिरी करावी लागेल. भारतीय संघात सध्या उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी नाहीत. ते परतल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये तंदुरुस्त आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूलाच संधी मिळेल. सध्या भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ बरीच मजबूत आहे. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज सारखे गोलंदाज आहेत, जे संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करू शकतात. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविणे इशांतचे मोठे आव्हानात्मक असेल.'

शाळेत प्रवेश मिळावा यासाठी इंशात प्रशिक्षकांकडे आला होता

ते म्हणाले की, 'एका विद्यार्थ्याने इशांतला माझ्याकडे आणले होते. इंशातला गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11 वीला प्रवेश घ्यायचा होता. स्पोर्ट्स कोट्यातून त्याला प्रवेश मिळावा म्हणून तो माझ्याकडे आला होता. मी विचारले की तू क्रिकेटमध्ये काय करतो? त्याने सांगितले की मी गोलंदाजी करतो. जेव्हा त्याने मी त्याला बॉल फेकण्यास सांगितले तेव्हा त्याचा वेग थक्क करणारा होता. त्याच्याकडे नैसर्गिक वेग होता. मग मी गंगा इंटरनॅशनल शाळेत त्याचा प्रवेश करून दिला. त्यानंतर पुढे जे झाले ते सर्वांसमोर आहे.'

वरिष्ठ खेळाडू नाराज झाले होते

प्रशिक्षक म्हणाले की, 'इशांतला माझ्या क्लबमध्ये संधी मिळाल्यावर अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज झाले होते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इंशातला इतक्या लहान वयात संधी देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मी त्यांना सांगायचो की इंशात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळेल. मात्र, इतक्या लहान वयात त्याला भारतीय संघाकडून संधी मिळेल असे कुणालाही वाटले नव्हते. इंशातला वयाच्या 19 व्या वर्षी भारतीय संघात खेळण्याची संधी मिळेल याबाबत मलाही अपेक्षा नव्हीत.'

बातम्या आणखी आहेत...