आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताचा अजेय कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयाचे श्रेय घेऊ इच्छित नाही. त्याऐवजी मुंबईच्या रहाणेने विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले. तो म्हणतो, “या गोष्टी वैयक्तिक स्तरावर वेगळ्या असतात, मात्र जेव्हा एक सामना किंवा मालिका जिंकतो तेव्हा त्यामध्ये संपूर्ण संघाचे योगदान असते. यात एका व्यक्तीचे योगदान नसते.’ रहाणेला विराटच्या अनुपस्थितीत कर्णधार बनवले. रहाणेने संघाचे नेतृत्व करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवला.
कर्णधार वयस्क असणे संघासाठी उत्तम : रहाणे
३२ वर्षीय रहाणेच्या मते, “संघ सहकारी तुम्हाला एक चांगला नेता बनवतात. गत काही वर्षे संघर्ष केल्यानंतर रहाणेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा चांगला ठरला. २०१७-१८ मध्ये द. अाफ्रिका दौऱ्यात रहाणे उपकर्णधार असताना पहिल्या २ कसोटीत बाहेर बसवले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रहाणेने आत्मविश्वास गमावला असल्याची टिप्पणी लोक करत होते. त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे. ऑस्ट्रेलिया दौरा त्याचे भवितव्य निश्चित करेल. मात्र, रहाणेला असे वाटत नव्हते. त्याने म्हटले की, “इमानदारीने सांगतो, माझे संघातील स्थान धोक्यात आहे असे कधी वाटले नव्हते. कर्णधार व संघ व्यवस्थापनाने माझ्यावर नेहमी विश्वास दाखवला. कधी कधी काही मालिकेत खेळाडू लयीत नसतात. त्याचा अर्थ खेळाडूचा दर्जा व कौशल्य संपले असा होत नाही.’
एका शानदार खेळीने खेळाडू पुन्हा लयीत येतो
खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल रहाणे म्हणतो, “खेळाडूंना लयीत येण्यासाठी एका चांगल्या खेळीची गरज असते. आम्ही संघातील प्रत्येकाच्या यशाचा आनंद साजरा करतो. मी जेव्हा लयीत नव्हतो तेव्हा प्रशिक्षक व कर्णधाराने नेहमी माझा आत्मविश्वास वाढवला.’ त्याने म्हटले की, “एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागते. एक खराब मालिका तुम्हाला खराब क्रिकेटपटू बनवते. मात्र, आपल्याकडे एका मालिकेतून तुमच्याबद्दल मत बनवले जाते. सर्व खेळाडूला या गोष्टीचा सामना करावा लागतो व अद्यापही आपण त्या समस्येचा सामना करतोय. तुम्ही खेळाडू म्हणून खेळा, नेतृत्व करा किंवा इतर कुठलीही भूमिका बजवा, त्या गोष्टीत आपले १०० टक्के योगदान दिले पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.