आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:50 फिक्सिंग प्रकरणांची चौकशी; सर्वाधिक सहभाग भारतीयांचा : आयसीसी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात दरवर्षी सट्टेबाजीचे ४० हजार कोटींचे मार्केट : मंडळ

फिक्सिंग रोखण्यासाठी आयसीसी खूप प्रयत्न करत आहे. आयसीसी भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एसीयू) समन्वयक अन्वेषण स्टीव्हन रिचर्डसनने म्हटले की, आम्ही ५० प्रकरणांत चौकशी करत आहोत. यात सर्वाधिक संबंध भारताशी जोडलेला आहे. त्यांनी म्हटले, सट्टेबाज राज्याची लीग आणि कमी चर्चेतील स्पर्धेत असे काम सहज करतो. बीसीसीआयसाठी ही चिंतेची बाबत आहे, कारण २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये वनडे विश्वचषकाचे भारतात आयोजन होत आहे.

क्रीडा कोडच्या चर्चेदरम्यान रिचर्डसनने म्हटले, भारतात त्यासंबंधी कोणताही कायदा नाही. त्यामुळे पोलिसांचे हात बांधलेले आहेत. जर कोणता कायदा आल्यास, ते महत्त्वाचे ठरेल. त्यांनी म्हटले की, ‘खेळाडू या जोडीतील शेवटचा भाग असतो. अडचण म्हणजे, जो याची सुरुवात करतो, तो मैदानाबाहेर बसतो. मी भारतीय सरकारी एजन्सीला अशी आठ नावे देऊ शकतो, जे खेळाडूंना पैसे देऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करताहेत.’ रिचर्डसननुसार, जर तुमच्याकडे कायदा आहे तर, एजन्सी सट्टेबाजांच्या तळाशी पोहोचू शकते. ऑन बोर्ड सट्टेबाजीचा मार्ग रोखण्यास मदत करतो. बीसीसीआय एसीयूचे प्रमुख अजितसिंगने म्हटले, सट्टेबाजीतून पैसे कमावण्यासाठी ते खेळाडू किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क करतात. त्याची वार्षिक उलाढाल ३० ते ४० हजार कोटी रुपये आहे. एका सामन्यात २० कोटी रुपयांपर्यंत पैसा लावला जातो. श्रीलंका पहिला देश आहे, जेथे फिक्सिंगवर कायदा बनवण्यात आला. आयपीएल २०१३ मध्ये सट्टेबाजीमध्ये सहभागी झाल्यामुळे श्रीसंत, अजित चंदेला आणि अंकित चव्हाणवर बंदी घालण्यात आली.

फिक्सिंगबाबत कठोर नियमांची आवश्यकता
भारतात भ्रष्टाचारावर बंदी आणली जाऊ शकते, जोपर्यंत येथे फिक्सिंगला कायदेशीर गुन्हा घोषित केले जाऊ शकत नाही, असे अायसीसीचे मत अाहे. रिचर्डसनने सांगितले की, ‘सामना फिक्सिंग विरुद्ध कायदा आणणारा श्रीलंका पहिला देश आहे, त्यामुळे तेथे क्रिकेट सुरक्षित आहे. भारतात असा कायदा नाही, ज्यामुळे बीसीसीआय भारतात माेकळ्या हाताने काम करू शकत नाही.’

बातम्या आणखी आहेत...