आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्रिकेटवर कोरोनाचा परिणाम:सौरव गांगुली म्हणाला - आयपीएल प्रेक्षकांशिवाय होऊ शकते, सर्व पर्यायांवर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनव्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे
  • आयपीएल आणि घरगुती सामन्यांसाठी गाइडलाइन्स तयार केली जात आहे - बीसीसीआय अध्यक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने लवकरच आयपीएल सुरू होण्याचे संकेत दिले. गुरुवारी तो म्हणाला की, आयपीएलसाठी सर्व संभाव्य पर्यायांवर चर्चा होत आहे. प्रेक्षकांशिवाय देखील स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. यावर्षी मार्च 29 पासून सुरू होणारे आयपीएल बीसीसीआयने कोरोनाव्हायरसमुळे आधीच अनिश्चित काळासाठी रद्द केले आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक देखील रद्द होण्याची शक्यता आहे. अशात त्याऐवी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते.  

प्रत्येक पर्यायावर होतीये चर्चा 

गांगुलीने सांगितले की, यावर्षी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी सर्व संभाव्या पर्यायांवर बीसीसीआय चर्चा करत आहे. यात ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय देखील होऊ शकते. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. दरम्यान आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते असे गांगुलीने सांगितले होते. 

अनेक खेळाडू आयपीएल खेळण्यास उत्सुक 

बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले की, "अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. चाहते, फ्रँचायझी, खेळाडू, प्रसारक, प्रायोजक आणि सर्व भागधारकांना यावर्षी आयपीएल होईल अशी अपेक्षा आहे. आयपीएलच्या भविष्याबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेईल."

बीसीसीआय मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहे

गांगुली यांनी सर्व संबंधित संस्थांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, "बीसीसीआय सर्व राज्य क्रिकेट संघटनांसाठी कोविड -19 स्टँडर्ड ऑपरेशन प्रक्रिया (एसओपी) मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम करीत आहे. या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व संघटना आपापल्या क्षेत्रात क्रिकेट सुरू करू शकतील. ते म्हणाले की, पुढील दोन महिन्यांत घरगुती क्रिकेट आणि प्रशिक्षण सुरू करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

बीसीसीआयला टी-20 विश्वचषकाच्या निर्णयाची प्रतिक्षा

आयसीसीने टी-20 विश्वचषकाबाबत बुधवारी व्हर्चुअल मीटिंग केली होती.यामध्ये वर्ल्ड कप विषयीचा निर्णय महिनाभरासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. सुत्रांनुसार, बीसीसीआय विश्वचषकासंदर्भात आयसीसीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

0