आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Cancelled, Postponed, Latest News Updates On Indian Premier League Over India Coronavirus (COVID 19) Outbreak Situation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवल्यामुळे आयपीएल टुर्नामेंट रद्द होण्याच्या मार्गावर, टी-20 विश्वचषकावरही प्रश्नचिन्ह

स्पोर्ट डेस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चला होणारा आयपीएल टुर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत स्थगित केला होता

कोरोना व्हायरस आणि देशा 3 मेपर्यंत वाढवलेल्या लॉकडाउनमुळे आयपीएल परत एकदा रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआय सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, लॉकडाउनमुळे आयपीएल तुर्तास रद्द करण्यात आला आहे. परिस्थिती आणि इंटरनॅशनल शेड्यूलमुळे टुर्नामेंट डिसेंबरमध्ये होईल का नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊसाचा ऋतू आहे, त्यामुळे त्या काळात सामने होणे कठिण आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. यातच आता या जागतिक महामारीवर लवकर औषध न मिळाल्यास येणाऱ्या सीरिजवरही टांगती तलवार आहे. 

आधी हे ठरले होते

यावेळेस आयपीएल 50 दिवसांऐवजी 44 दिवसांचा होणार होता. सर्व 8 संघांमध्ये 9 शहरात 14-14 सामने होणार होते. याशिवाय 2 सेमीफायनल, 1 नॉकआउट आणि 24 मेला वानखेडेमध्ये अंतिम सामना होणार होता. पण, आता बीसीसीआय या फॉर्मेटला अजून लहान करुन 2009 प्रमाणे 37 दिवसांचा करू शकते. तेव्हा लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दक्षिण आफ्रीकेत खेळवण्यात आला होता.

सप्टेंबरमध्ये आशिया कप

सप्टेंबरपासून यूएईत आशिया कप टी-20 होणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. परंतू, वर्ल्ड कप आणि आशिया कपवरही अजून काहीच ठरलेले नाही. आशिया कप रद्द होण्याच्या स्थितीत आहे. बीसीसीआय या सर्व शेड्यूलला लक्षात ठेवून आयपीएलचे शेड्यूल तराय करू शकते. 

यावर्षी आयपीएलला विसरून जा- गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने रविवारी म्हटले होते की, ''आम्ही परिस्थीवर लक्ष देऊन आहोत. सध्या काहीच स्पष्टपणे सांगू शकत नाही. सध्या कोणताच उपाय दिसत नाहीये. विमानतळे बंद आहेत, लोक आपापल्या घरात कैद आहेत. कोणीच कुठे जाऊ शकत नाही. ही परिस्थिती मे महिन्यातही सुरुच राहू शकते. अशा परिस्थिती खेळाडूंना परदेशातून भारतात आणणार कसे आणि त्यांना भारतात खेळवणार कसे. माझ्या मते यावर्षी तुम्ही आयपीएलला विसरुन जा''

बातम्या आणखी आहेत...