आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संक्रमण: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह, बीसीसीआयला 2 हजार तर प्रत्येक टीमला 100 कोटी रुपयांचे नुकसान

Mumbai6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मे महिन्यात आयपीएल सुरू होण्याची शक्यता, 2009 प्रमाणे फक्त 37 दिवसात 59 सामने होतील

स्पोर्ट डेस्क- देशात वाढत असलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे यावर्षी होणाऱ्या आयपीएलवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने नुकतच टूर्नामेंटला 29 मार्चवरुन 15 एप्रिलपर्यंत स्थिगित केले आहे. परंतू, आता ही तारीखदेखील बदलू शकते किंवा यावर्षी आयपीएल रद्द होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मे महिन्यात आयपीएल खेळवण्याची शेवटची संधी असेल. जर मे महिन्यातही आयपीएल झाले नाही, तर यावर्षीचा आयपीएल सोहळा रद्द केला जाईल. जर आयपीएल रद्द झाले, तर बीसीसीआयला 2 हजार कोटी आणि प्रत्येक टीमला 100-100 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. आयपीएल रद्द झाल्यावर फ्रेचाजजींना मोबदलाही मिळणार नाही.
आयपीएलबाबत बीसीसीआय आणि सर्व फ्रेंचायजिंची आज बैठक होणार होती. पण, कोरोना व्हायरसमुळे या बैठकीला पुढील आठवड्यांपर्यंत टाळण्यात आले. यापीर्वीच खेळ मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, आयपीएलबाबतचा निर्णय सरकारच्या पुढील अॅडवायजरीनंतरच घेतला जाईल. ही अॅडवायजरी 15 एप्रिलनंतर होईल.

बीसीसीआय या परिस्थिती आयपीएल खेळवण्याच्या बाजुने नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता, आयपीएल होण्याची आशा खूप कमी आहे. यातच बीसीसीआयदेखील आयपीएल खेळवणाऱ्या बाजुने नाही. दुसरीकडे, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘भविष्यात काय होईल, हे कोणालाच माहीत नाही. व्हिसा आणि प्रवासावर निर्बंध असल्यामुळे आयपीएल कसा खेळवला जाईल, हाच विचार आम्ही करत आहोत. सध्या कोणाकडेच ठोस प्लॅन नाही. आयपीएल सोबतच जगातील अनेक मोठे टुर्नामेंट आणि ऑलंपिकवरही धोका निर्माण झाला आहे.’’

0