आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Income, BCCI Earned Rs 4000 Crore From IPL 2020, TV Viewership Increased By 25 Per Cent, Hotstar, BARC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:आयोजन बजेटमध्ये 35% ची कपात, कमाई गतवर्षीसारखी 4000 कोटींची; 1800 जणांच्या 30 हजार कोरोना टेस्ट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिअरलीडर्स, तिकीट काउंटर नाही, सामन्यांसाठी तीनच मैदानांची केली निवड

काेराेना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर माेठा परिणाम झाला. त्यामुळे अनेक माेठ्या स्पर्धांचे आयाेजन स्थगित झाले. मात्र, अशाही संकटाच्या काळामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्राेफेशनल लीग आयपीएल यशस्वीपणे आयाेजित केली. भारतामध्ये काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन बीसीसीआयने आयपीएलचे आयाेजन विदेशात यूएईमध्ये केले. विदेशात आयाेजन करूनही बीसीसीआयला आर्थिक स्वरूपातील मजबुती यशस्वीपणे सांभाळता आली. यातूनच बीसीसीआयने या लीगच्या माध्यमातून विदेशामध्ये गतवर्षीसारखीच ४००० काेटी रुपयांची कमाई केली आहे. लीगच्या आयाेजनासाठीच्या अंदाजपत्रकामध्ये (बजेट) बीसीसीआयने तब्बल ३५ टक्क्यांची कपात केली हाेती.

काेराेना टेस्टने राेखले संकट :

बीसीसीआयने आयपीएलदरम्यान काेणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माेठी खबरदारी केली. आराेग्य व वैद्यकीय सुरक्षेबाबत सावधगिरी बाळगण्यात आली. यासाठी मंडळाने १८०० जणांच्या तब्बल ३० हजार काेराेना टेस्ट केल्या. बायाे-बबलसारखे काेराेनाच्या संकटाला राेखणारे आवरणही उपलब्ध करण्यात आले हाेते, अशी माहिती मंडळाचे काेषाध्यक्ष धुमाळ यांनी दिली.

तीन मैदानांमुळे खर्च आटाेक्यात :

यूएईमध्ये आयपीएलचे आयाेजन करताना आम्ही मर्यादित आणि जवळच्या मैदानाच्या निवडीवर अधिक भर दिला. यातूनच आम्ही आयपीएलसाठी फक्त तीनच मैैदाने निवडली. यातून काेराेनाचा धाेकाही कमी झाला. कारण या मैदानावरील प्रवासही जवळचाच हाेता. यातून खेळाडूंसाठीही हे अधिकच साेयीस्कर आणि आराेग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरले, असेही धुमाळ यांनी सांगितले.

आता पुढच्या लीगमध्ये प्रत्येक संघात ५ विदेशी खेळाडू

आता पुढच्या वर्षी हाेणाऱ्या १४ व्या सत्राच्या आयपीएलसाठी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. खासकरून पुढच्या सत्रापासून प्रत्येक टीममध्ये आता पाच विदेशी खेळाडू असणार आहेत. आतापर्यंत चारच विदेशी खेळाडूंचा समावेश हाेता. यावर आता अधिकृत शिक्कामाेर्तब आगामी बीसीसीआयच्या बैठकीत हाेणार आहे. याशिवाय संघांची संख्याही वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

टी-२० : आता १० सेकंदांसाठी साडेसात लाख रुपये

शुक्रवारपासून भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेला सुरुवात हाेत आहे. मालिकेदरम्यान ब्राॅडकास्टचे दर चर्चेत आले आहेत. या प्रक्षेपणासाठी १५ ते १६ प्रायाेजक मिळण्याची संधी आहे. त्यानंतर हाेणाऱ्या टी-२० मालिकेदरम्यान १० सेकंदांसाठी साडेसात लाख रुपये माेजावे लागतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser