आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020, IPL 2020 Latest News, IPL 2020 Latest News Update, IPL 2020 Schedule, IPL 2020 Full Schedule Release, IPL, BCCI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विश्लेषण:आयपीएलमध्ये 8 पैकी 7 संघांचे प्रशिक्षक विदेशी; मोठे नाव, वलयांकित प्रशिक्षकांना फ्रँचायझींकडून प्राधान्य

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग क्वॉरंटाइननंतर संघासोबत शिबिरस्थळी पोहोचले.
  • सर्व 12 वेळा विदेशी प्रशिक्षकांच्या टीम चॅम्पियन बनल्या
  • पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळेच भारतीय, इतर कोच विदेशी

आयपीएलच्या चालू सत्रात ८ पैकी ७ संघांचे प्रशिक्षक विदेशी आहेत. केवळ किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे भारतीय आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग, चेन्नई सुपरकिंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम, मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने, सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस आणि रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक सायम न कॅटिच आहेत. कारण, फ्रँचायझी मोठे नाव व वलयांकित प्रशिक्षकांना प्राथमिकता देतात. आयपीएलमध्ये आतापर्यंत १२ सत्रांत प्रत्येक वेळी विदेशी प्रशिक्षकांची टीम चॅम्पियन बनली आहे. न्यूझीलंडचे फ्लेमिंग तर पहिल्या सत्रापासून सीएसकेचे प्रशिक्षक आहेत. सीएसकेची लीगमधील विजयाची सरासरी ६१.२८ आहे, इतर संघापेक्षा अधिक आहे. फ्रँचायझींचे विदेशी प्रशिक्षक निवडण्याचे कारण....

१. प्रत्येक संघाची गरज वेगवेगळी

मुंबई इंडियन्सचे माजी सीईओ शिशिर हटंगडीनुसार, क्रिकेट प्रशिक्षणात मुख्य प्रशिक्षकासाठी तुमचे नाव व वलय मोठे असणे गरजेचे आहे. फ्रँचायझी प्रथम अशाच नावाला पसंती देते. दिल्ली कॅपिटल्सचे माजी सीईओ हेमंत दुआनुसार - प्रत्येक संघाची गरज वेगवेगळ्या पद्धतीची असते. आयपीएल जागतिक लीग व त्याचा दर्जा मोठा आहे. रणजी ट्रॉफीत चांगले काम करणारे प्रशिक्षक टी-२० प्रशिक्षणाचा भाग होऊ शकतात, असे नाही. कारण दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट आहे.

२. प्रशिक्षकांसाठी कोटा पद्धत असावी

मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत म्हणतात - ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग किंवा जगातील कोणत्याही टी-२० लीगमध्ये भारतीय प्रशिक्षकांना किती संधी मिळते? आयपीएलमध्ये आपल्याच प्रशिक्षकांना किंमत मिळत नाही. भारतीय प्रशिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राजपूत खेळाडूंप्रमाणे प्रशिक्षणात ‘कोटा पद्धत’ आणू इच्छितात. संघात जसे ४ विदेशी खेळाडू असतात, तशी पद्धत प्रशिक्षणात असावी.

३. संघातील खेळाडू माहिती देतात

केकेआरकडून खेळलेल्या आकाश चोपडाने म्हटले - संघ मालक शाहरुख खानला वाटले, जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक व स्टाफ आपल्याकडे असावा. त्यांनी जॉन बुकानन, अँड्यू लीप्सला संघात आणले. कर्णधार प्रशिक्षकासोबत खेळलेल्या घरच्या खेळाडूंकडून माहिती घेतात. म्हणजे, गॅरी कर्स्टनला निवडण्यापूर्वी कोहलीने दिल्लीच्या खेळाडूंशी चर्चा केली असेल.