आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:चेन्नईचे सुपरकिंग्ज सरावासाठी 15 ऑगस्टपासून दुबईच्या मैदानावर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई संघाच्या डुप्लेसिसने अाफ्रिकेत अायपीएलची तयारी सुरू केली.
  • रविवारी गव्हर्निंग काैन्सिलची बैठक; टीम चार्टर्ड फ्लाइटने हाेणार रवाना

दुबईच्या मैदानावर यंदाची आयपीएल खेळण्यासाठी सर्वच संघ उत्सुक आहेत. यासाठी सहभागी हाेणाऱ्या आठ संघांनी आता सरावासाठी दुबईमध्ये खास फील्डिंग लावण्यास सुरुवात केली. धाेनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ आता १५ आॅगस्टपासून आयपीएलच्या तयारीसाठी मैदानावर उतरणार आहे. यासाठी हा संघ १० किंवा ११ आॅगस्ट राेजी दुबईला रवाना हाेण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काैन्सिलची बैठक हाेणार आहे. या बैठकीनंतर आता चेन्नईच्या सुपरकिंग्जसाठी खास चार्टर्ड फ्लाइट बुक करण्यात येईल. याच फ्लाइटने हा संघ दुबईला रवाना हाेणार आहे. १९ सप्टेंबरपासून १३ व्या सत्राच्या आयपीएलला यूएईमध्ये सुरुवात हाेईल. तीन मैदानांवर या लीगचे सामने आयाेजित करण्यात आले.

‘आम्ही लवकरच दुबईच्या मैदानावर सराव सुरू करणार आहोत. यासाठी पुढच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या ठिकाणी दाखल हाेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यातून येथील वातावरणात आमच्या खेळाडूंना व्यवस्थित पद्धतीने रुळता येईल. याचा खेळाडूंच्या दर्जेदार कामगिरीसाठी माेठा फायदा हाेणार आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंग्जच्या वतीने देण्यात आली. ‘आम्ही सर्व संघांना आता सरावासाठी दुबईला जाण्याचे सुचवले आहे. त्यामुळे फ्रंॅचाइसी आपापल्या पद्धतीने याठिकाणी सरावाची व्यवस्था करत आहे, अशी माहिती बीसीसीआयचे धुमाळ यांनी या वेळी दिली.