आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 | Preparations For The Franchise Begin, With Players Taking Private Flights To The UAE; The Search For The Hotel Is Now Underway To Stop The Players

आयपीएल 2020:फ्रँचायझींची तयारी सुरू, खेळाडू खासगी विमानाने यूएईला; खेळाडूंना थांबण्यासाठी आता सुरू आहे हाॅटेलचा शाेध

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मैदानात ९ खेळपट्ट्या, इतर सामन्यांचे आयोजन करणार नाही : हनीफ

बीसीसीआयने आतापर्यंत आयपीएल टी-२० लीगची तयारी जाहीर केली नाही, मात्र फ्रँचायझी संघांनी तयारी सुरू केली. आयसीसीकडून टी-२० विश्वचषकावरील अंतिम निर्णय आल्यानंतर आयपीएलच्या तारखेची घोषणा होईल. आयपीएल टीम स्पर्धा यूएईमध्ये करणे निश्चित आहे. खेळाडू खासगी विमानांनी यूएईला जातील. सर्व संघांनी हॉटेलदेखील पाहण्यास सुरुवात केली. एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आम्ही अबुधाबीमध्ये हॉटेल पाहण्यास सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीने नियोजन करतोय. ते सराव कसा करतील याची तयारी सुरू केली. आम्हाला आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे. आम्ही अबुधाबीमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहोत व तेथे कसे जाऊ, हे निश्चित केले आहे. यूएईमध्ये पोहोचल्यावर क्वाॅरंटाइनची प्रक्रिया कशी असेल.’ एक माजी चॅम्पियन संघाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्ही खेळाडूंना भारतात एकत्र करण्याची तयारी करतोय. आम्ही संघाला बायो सुरक्षेमध्ये ठेवणार आहोत, चाचणी होईल आणि त्यानंतर यूएईसाठी रवाना होतील. त्याचे कारण म्हणजे आपण सर्व जण घरात आहोत. जर कोणता खेळाडू विना लक्षण पॉझिटिव्ह आढळला, तर तो दुसऱ्यांना बाधित करू शकतो. त्यामुळे आपण काही दिवस आयसोलेशनमध्ये जाणे चांगले आहे, जेथून कोरोना चाचणी झाल्यानंतर पुढे रवाना होता येईल.” इतर एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने प्रवासाबद्दल म्हटले की, खासगी विमान उत्कृष्ट पर्याय आहे, त्या वेळेपर्यंत विमानसेवा सुरू होईल की नाही, सांगता येत नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मला वाटते की, सर्व संघ नाही, तर जास्तीत जास्त संघ खासगी विमानाचा विचार करताेय. सर्व संघ ऑगस्टच्या अखेरच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात यूएईमध्ये पोहोचतील. अशा परिस्थितीत खासगी विमानाने प्रवास केलेला चांगला असणार आहे.

मैदानात ९ खेळपट्ट्या, इतर सामन्यांचे आयोजन करणार नाही : हनीफ

दुबई सिटीचे क्रिकेट व स्पर्धा प्रमुख सलमान हनीफने म्हटले की, आयपीएलच्या आयोजनासाठी सुविधा तयार ठेवल्या आहेत. क्रीडा नगरीमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम व आयसीसी अकादमीचा समावेश आहे. या दरम्यान हनीफने म्हटले, ‘जर कमी वेळेत अधिक सामन्यांचे आयोजन केले जात असतील तर, स्टेडियममध्ये ९ खेळपट्ट्या चांगल्या स्थितीत आहेत. आम्ही खेळपट्ट्या चांगल्या ठेवण्यासाठी इतर सामन्यांचे आयोजन करणार नाही.’

विदेशी खेळाडू थेट दाखल हाेणार यूएईत : 

सर्व फ्रँचायझींच्या विदेशी खेळाडूंना थेट यूएईमध्ये बोलावण्यासाठी एकमत झाले. आमच्या सर्वांचे एक मत झाले आहे, विदेशी खेळाडू थेट यूएईमध्ये येतील. काेणता खेळाडू भारतात येईल १०-१४ दिवस क्वाॅरंटाइन होईल व पुन्हा यूएईमध्ये जाऊन तेथे क्वाॅरंटाइन होईल. विदेशी खेळाडू थेट तेथे भेटणार आहे.