आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीसीसीआय आयपीएलच्या चालू सत्राच्या मुख्य प्रायोजकासाठी लवकरच निविदा मागवू शकते. गेल्या काही दिवसांपासून वादामुळे चीनची मोबाइल कंपनी व्हिवोने चालू सत्रासाठी प्रायोजकत्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा करार २०२२ पर्यंत होता. व्हिवो प्रत्येक वर्षी प्रायोजक म्हणून ४४० कोटी रुपये देत होती.
नव्या प्रायोजकांच्या शर्यतीत बायजू, अॅमेझॉन, रिलायन्स जिओ आणि कोकाकोला इंडिया आहे. मात्र, कोराेनामुळे अद्याप या कंपन्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशात नव्या करारातून मंडळाला ४४० कोटी रुपये मिळणे कठीण आहे. बायजू लीगच्या प्रायोजकासाठी चर्चा करत आहे. बायजूच्या अधिकाऱ्याने म्हटले की, कंपनीने करारासाठी ३०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. मार्चमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने नोकियाच्या जागी बायजूला संघाचे प्रायोजक बनवले. दुसरीकडे, कोकाकोला इंडियाने म्हटले की, आम्ही क्रिकेटमध्ये नियमित गुंतवणूक करू इच्छितो.
फ्रँचायझींना प्रायोजकातून होणाऱ्या आर्थिक नुकसान भरपाईची अपेक्षा
मंडळ एकीकडे व्हिवोच्या जागी दुसरे प्रायोजक शोधत आहे. दुसरीकडे फ्रँचायझीने पैशाची आपली मागणी कायम ठेवली आहे. एका फ्रँचायझीला निश्चित मिळणाऱ्या निधीची नुकसान भरपाई हवी आहे. कारण, यंदा सामने विनाप्रेक्षक होणार आहेत. एक फ्रँचायझी व्हिओला बाजूला केल्यानंतर मंडळाला पैसे मागत आहे. मंडळाकडून प्रत्येक फ्रँचायझीला प्रायोजकातून २०-२० कोटी मिळणार होते.
एसओपीकडे लक्ष देणे महत्त्वाचे; एका प्रकरणातून संपूर्ण स्पर्धा संकटात येऊ शकते
किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहमालक नेस वाडियाने म्हटले की, सध्या प्रायोजकाची चर्चा होत असेल, मात्र आपल्याला मंडळाकडून मिळणाऱ्या एसओपीवर लक्ष द्यावे लागेल. कारण एकही कोरोनाचे प्रकरण पुढे आले तर, त्याचा परिणाम संपूर्ण स्पर्धेवर होऊ शकतो. अनेक फ्रँचायझीने एसओपीमध्ये सूट देण्याची मागणी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.