आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Updates : Corona Virus Infiltration Into Abu Dhabi; The First 20 Matches Will Be Played At The Dubai Ground

आयपीएल 2020:अबुधाबीमध्ये काेराेनाचा शिरकाव; सुरुवातीचे 20 सामने हाेणार दुबईच्या मैदानावर, काेेराेनाचा धाेका वाढल्याने निर्णय

दुबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई इंडियन्सने नवीन जर्सी लाँच केली आहे.
  • चेन्नई सुपरकिंग्ज संघ लीग सुरू हाेण्यापूर्वीच अडचणीत, चेन्नईची सलामीची लढत रद्द़

जगाच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाच्या महामारीने थैमान घातले आहे. आता याचा धाेका वेगाने अबुधाबी आणि यूएईमध्येही वाढत आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या आयाेजनावर टांगती तलवार आहे. दाेन आठवड्यांनी या स्पर्धेची सुरुवात हाेईल. सध्या काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन आयपीएलमधील सुरुवातीचे २० सामने दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येतील, असा तातडीने निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने सध्याच्या दुबईमधील आणि बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन या निर्णयाची घाेषणा केली. येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये १३ व्या सत्राच्या आयपीएलला सुरुवात हाेणार आहे. या लीगसाठी आता आठपैकी सहा संघ दुबईमध्ये कसून सराव करत आहेत. मुंबई इंडियन्स आणि काेलकाता नाइट रायडर्स संघ अबुधाबीमध्ये सराव करत आहेत. अबुधाबीला रवाना हाेण्यापूर्वी ४८ तास आधी काेराेना टेस्ट करावी लागते. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी या दाेन्ही संघांनी थेट अबुधाबीत मुक्काम आहे.

वेळेत सुरू हाेईल लीग :

येत्या दाेन आठवड्यांनी या लीगला सुरुवात हाेईल. सध्या काेराेनाचा धाेका वाढताना दिसत आहे. मात्र, सर्व परिस्थिती आटाेक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यातूनच ही लीग निश्चित वेळापत्रकानुसारच सुरू हाेईल, असा विश्वास बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीने व्यक्त केला. आठ संघांची दाेन गटात विभागणी करण्यात आली.

चेन्नईची सलामी लढत रद्द़

काेराेनामुळे धाेनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ लीग सुरू हाेण्यापूर्वीच अडचणीत सापडला आहे. टीमचे १३ खेळाडू पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर आले. याशिवाय खासगी कारणामुळे टीमच्या सुरेश रैनाने ही माघार घेतली. त्यामुळे चेन्नई टीमला लीगच्या तयारीसाठी अद्याप सराव सुरू करता आलेला नाही. यातूनच चेन्नईने आपला सलामी सामना रद्द करण्याची मागणी केली. लीगचा सलामी सामना चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हाेणार हाेता.

0