आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Updates | IPL 2020 In UAE Schedule Permissions Granted To Sports Ministry BCCI Wait For Home And Foreign Ministry News Updates

आयपीएल 2020:युएईमध्ये आयपीएल घेण्यास क्रीडा मंत्रालयाची मंजुरी, आता गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीची प्रतिक्षा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलचे सामने युएईमध्ये दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे होतील. फाइल फोटो
  • युएईला बीसीसीआयचे अधिकृत पत्र मिळाले, आयपीएल 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होईल

क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल युएईमध्ये करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. बीसीसीआयला अद्याप अधिकृत घोषणा करण्यासाठी गृह मंत्रालय व परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार आहे. क्रीडा मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती भास्करला दिली आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल म्हणाले की बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन करण्यासाठी युएई अमीरात क्रिकेट मंडळाला (ईसीबी) स्वीकृतीपत्र पाठविले आहे. युएईनेही हे पत्र मिळाल्याची पुष्टी केली आहे.

गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजूर मिळणे निश्चित

अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआयला क्रीडा मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडूनही मंजुरी मिळेल. जर आयपीएलमध्ये भारताशी वाद विवादित देशाचा एखादा खेळाडू खेळत असेल तर गृहमंत्रालय व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून मान्यता मिळवणे अवघड झाले असते, परंतु आता तसे काही नाही. त्याचबरोबर युएई बरोबर आमचे चांगले संबंध आहेत. अशात तेथे आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्पर्धेच्या 3-4 आठवड्यांपूर्वी संघांनी तयारी करणे आवश्यक

बृजेश पटेल म्हणाले की, "आम्ही ईसीबीला स्वीकृती पत्र पाठवले आहे. आता दोन्ही देशांचे बोर्ड या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी एकत्र काम करतील. सर्व 8 संघांची पूर्व-स्पर्धा प्रशिक्षण शिबिरे युएईमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात होतील. संघांना स्पर्धेच्या 3 ते 4 आठवडे आधी तयारी करावी लागले."

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक या आठवड्यात होईल. यामध्ये स्पर्धेचे वेळापत्रक आणि एसओपी निश्चित केले जातील.