आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Updates : Mumbai Indians Players Will Wear Special Rings, Know Body Temperature; Bio safe Environment Created By BCCI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:मुंबई इंडियन्सचे खेळाडू विशेष रिंग घालणार, शरीराचे तापमान कळणार; बीसीसीआयने बनवले जैवसुरक्षित वातावरण

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज आयपीएलचे वेळापत्रक होवू शकते जाहीर, आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांची माहिती

कोरोनादरम्यान १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएल सुरू होत आहे. लीगची सध्याची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स या संसर्गापासून आपल्या खेळाडूंना वाचवण्यासाठी विशेष रिंग देणार आहे. बीसीसीआयने आधीच जैवसुरक्षित वातावरण बनवले आहे, नियमावलीदेखील जाहीर केली. ही रिंग एक पर्सनल हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. यात हार्ट रेट, त्यात होणारे बदल, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचे तापमान दाखवते. काही अडचणी असल्यास त्वरीत माहिती कळते. सूत्रांनुसार, स्मार्ट रिंग व्यक्तीचे पल्स, हालचाली व तापमान नियंत्रित ठेवते, ज्यामुळे दररोज आरोग्याचे विश्लेषण करण्यास मदत मिळते.

अमेरिकेत एनबीएमध्ये अशाच प्रकारचे रिंग हेल्थ डिव्हाइसचा वापर करतात. मुंबई इंडियन्सने स्वत: आपले सुरक्षित वातावरण बनवले आहे. संघातील एका खेळाडूने म्हटले की, “आम्ही डोक्यापासून पायापर्यंत झाकलो गेलो आहोत. पीपीई किट, मास्क, फेस शील्ड व ३ जोड्या ग्लोव्हज दिले. त्यामुळे तुम्ही कोणत्या खेळाडूला ओळखू शकत नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला आमच्या सुरक्षेची किती काळजी आहे, हे कळते. संपूर्ण टीम कुटुंबाप्रमाणे आहे.’

आज आयपीएलचे वेळापत्रक होवू शकते जाहीर :

आपीएलच्या १३ व्या सत्राचे आज वेळपत्रक जाहीर होवू शकते, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी दिली. मुंबई व चेन्नई यांच्यात पहिला सामना होवू शकतो. ५३ दिवसांत ८ संघांमध्ये १४-१४ सामने व १ एलिमिनेटर, दोन क्वालिफायर व फायनलसह ६० सामने होतील.

मुस्ताफिजुरला परवानगी नाकारली

बांगलादेश क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली. अहवालानुसार, मुस्ताफिजुरला मुंबई इंडियन्स व केकेआरकडून प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मंडळाने संघ पुढील महिन्यात श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका असल्याने त्याला परवानगी दिली नाही. यंदा लिलावात त्याला कोणी खरेदी केले नाही.