आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Updates : Patanjali Withdraws From Title Sponsorship Race; Announcing The Sponsor Today, Four Companies Are Looking Forward

आयपीएल 2020:टायटल स्पाॅन्सरशिप रेसमधून पतंजली कंपनीची माघार; आज स्पाॅन्सरची घाेषणा, चार कंपन्या आहे उत्सुक

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भारतीय कंपन्यांच्या सहभागानंतरच आम्ही निर्णय घेऊ : बाबा रामदेव

आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या आयाेजनादरम्यान टायटल स्पाॅन्सरशिपसाठी पतंजली आयुर्वेद कंपनीला प्रबळ दावेदार मानले जात हाेते. मात्र, याेगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने या रेसमधून माघार घेतली आहे. या प्रायाेजकांच्या रेसमध्ये काेणत्याही भारतीय कंपन्यांचा सहभाग नाही. त्यामुळे आम्ही बाहेर हाेण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी दिली. आज मंगळवारी आयपीएलच्या टायटल स्पाॅन्सरशिप कंपनीच्या नावाची घाेषणा केली जाईल. या रेसमध्ये बायजू, अन-अकादमी, टाटा सन्स व ड्रीम इलेव्हन कंपनींचा समावेश कायम आहे.

धाेनीकडील नेतृत्व कायम ठेवण्यासाठी अधिकाराचा वापर

चेन्नई | निवड समितीचा निर्णय बदलून धाेनीकडील भारतीय संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांनी आपल्या पदाचा वापर केला. यातूनच धाेनीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले हाेते. ही माहिती श्रीनिवासन यांनी िदली. २०११ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघ हा इंग्लंड दाैऱ्यात सपशेल अपयशी ठरला हाेता. त्यानंतर धाेनीच्या नेतृत्वावर प्रचंड टीका झाली. यातून त्याच्याकडील कर्णधारपद काढून घेण्याच्या जाेरदार हालचाली सुरू झाल्या हाेत्या. मात्र, याच वेळी श्रीनिवासन यांची मध्यस्थी केली आणि कर्णधारपद कायम ठेवले.

जयदेव उनाडकटकडे राजस्थान राॅयल्सचे नेतृत्व

युवा खेळाडू जयदेव उनाडकट आयपीएलमध्ये राजस्थान राॅयल्स संघाचे नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार स्मिथच्या अनुपस्थितीत जयदेवकडे कर्णधारपद साेपवण्यात आले. स्मिथ हा आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातील सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम यादरम्यान इंग्लंड दाैऱ्यावर असेल.

केकेआरचा मुक्काम अबुधाबीत; कार्लटन हाॅटेल बुक

काेलकाता नाइट रायडर्स संघ २० किंवा २१ ऑगस्ट राेजी यूएईत दाखल हाेईल. या लीगच्या दरम्यान काेलकाता संघाचा मुक्काम अबुधाबीमध्ये असणार आहे. मालक शाहरुख खानने हा निर्णय घेतला. यासाठी अबुधाबीमधील द रिट््झ कार्लटन हाॅटेलची बुक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...