आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये १३ व्या सत्राच्या आयपीएलला सुरुवात हाेईल. याची अधिकृत अशी घाेषणा रविवारी आयपीएलच्या गर्व्हनिंग काैन्सिलने केली. याशिवाय १० नाेव्हेंबर राेजी फायनल हाेईल. प्रत्येक संघाचे २४ खेळाडू हे यूएईला रवाना हाेतील. मात्र, राजस्थान, हैदराबाद व पंजाबचे प्रत्येकी २५ खेळाडू संघात आहेत. त्यामुळे या तिन्ही टीमला प्रत्येकी एक खेळाडू कमी करून २४ जणांना यूएईला पाठवावे लागणार आहेत.
२६ ऑगस्टनंतर सर्व संघांचे खेळाडू हे यूएईला रवान हाेतील. या लीगचे सर्व सामने दुबई, अबुधाबी व शारजाह मैदानावर आयाेजित केले जाणार आहेत. सामने रात्री ८ वाजेऐवजी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू हाेतील.
दहा दिवसांत प्रत्येकी दाेन सामने हाेतील. आयपीएलसाठीची चिनी कंपनी व्हिवाेची स्पाॅन्सरशिप कायम ठेवली आहे, असेही बैठकीत सांगितले. तसेच केंद्र सरकारने विदेशात आयपीएल आयाेजनाला परवानगी दिली आहे.
महिलांची आयपीएल हाेणार :
महिलांच्या आयपीएलचे आयाेजन निश्चित वेळेनुसार केले जाईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष साैरव गांगुली यांनी रविवारी दिली. मात्र, त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे यंदा पुुरुषांपाठाेपाठ आता महिलांचीही आयपीएल आयाेजित केली जाईल. १ ते १० नाेव्हेंबरदरम्यान महिलांची टी-२० चॅलेंजर सिरीज यूएईमध्ये आयाेजित केली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
याशिवाय याच आयपीएलच्या आयाेजनापूर्वी भारताचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि विंडीजविरुद्ध मालिका खेळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी आॅक्टाेबरमधील या मालिकेच्या आयाेजनाला दुजाेरा दिला आहे. याच मालिकेच्या माध्यमातून भारताच्या महिला संघाला न्यूझीलंडमध्ये आयाेजित विश्वचषकाची तयारी करता येईल.
मात्र, याच दरम्यान ऑस्ट्रेलियात असलेल्या बिग बॅश लीगमध्ये भारताच्या महिला खेळाडूंना सहभागी हाेता येणार नाही. भारताकडून महाराष्ट्राची अव्वल फलंदाज स्मृती मानधना, जेमिमा राॅड्रिग्जसह वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत काैर दरवर्षी या बिग बॅश लीगमध्ये सहभागी हाेतात.
करारबद्ध महिला खेळाडूंसाठी ट्रेनिंग कॅम्प :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी करारबद्ध असलेल्या महिला खेळाडूंच्या तयारीसाठी ट्रेनिंग कॅम्पचे आयाेजन केले जाईल, असेही अध्यक्ष गांगुली यांनी सांगितले. मात्र, आम्ही खेळाडूंच्या आराेग्याबाबत काेणतेही दुर्लक्ष करणार नाही. काेराेनाच्या भीतीमुळे बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमी बंद करण्यात आली. मात्र, आमच्याकडे वेगळा प्लॅन तयार असल्याचीही माहिती गांगुली यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.