आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2020 Updates : The Schedule Of The IPL 2020 Will Be Released On 6 September , Information Of Chairman Brijesh Patel; The Tournament Will Be Held In The UAE From September 19 To November 10

आयपीएल 2020:उद्या जारी होणार स्पर्धेचे शेड्यूल, चेअरमन बृजेश पटेल यांची माहिती; 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान यूएईत होणार स्पर्धा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी आयपीएलमध्ये 8 संघात एकूण 60 सामने होणार आहेत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सीझन-13 चा शेड्यूल रविवारी जारी करण्यात येणार आहे. आयपीएलचे चेअरमन बृजेश पटेल यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे या वर्षीचा टूर्नामेंट यूएईत होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. आयपीएल बायो-सिक्योर वातावरणात होणार आहे. 53 दिवसांत सर्व 8 संघ 14-14 सामने खेळतील. एक एलिमिनेटर, दोन क्वालिफायर आणि फायनलसह आयपीएलमध्ये एकूण 60 सामने होतील.

मुंबई-चेन्नईत होऊ शकतो पहिला सामना

मागील मोसमातील विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळला जाईल असे मानले जात आहे. दरम्यान सीएसकेचे दोन खेळाडूंसह दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह 11 स्टाफ सदस्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये उपस्थित बीसीसीआयचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीही पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तीन मैदानांवर होणार सर्व सामने

बीसीसीआयचे ट्रॅजरर अरुण धुमळ बुधवारी म्हणाले होते की, सर्व सामने शेड्यूलनुसार होतील. हे सर्व सामने यूएईतील तीन शहरे दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये होतील. पहिल्यांदाच स्पर्धेचा अंतिम सामना वीकेंड ऐवजी वीक-डे (मंगळवारी) होणार आहे. संध्याकाळचे सामने जुन्या शेड्यूलच्या अर्ध्या तासाच्या आधी म्हणजे 7.30 वाजता सुरू होतील. दुपारचे सामने 3.30 पासून खेळले जातील.

स्पर्धेत एकूण 20 हजार कोरोना चाचण्या होतील

यावेळी आयपीएलमध्ये खेळाडूंसह स्टाफ सदस्यांची दर 5 व्या दिवशी कोरोना चाचणी होणार आहे. स्पर्धेदरम्यान जवळपास 20 हजार चाचण्या केल्या जातील. यासाठी बीसीसीआयने 10 कोटींचे बजट मंजूर केले आहे. जर कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला 7 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. या दरम्यान तीन चाचण्या होतील. यामध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला बायो-सिक्योरमद्ये प्रवेश दिला जाईल.