आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:प्रवास कमी करण्यासाठी दोन गटांत संघांच्या विभागणीची तयारी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप लीगच्या तारखेची अधिकृत घोषणा नाही

आयपीएलच्या १४ व्या सत्राबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, कोरोनाचे वाढते प्रकरण पाहता बीसीसीआय यंदा “कारवां स्टाइल’ मध्ये या टी-२० स्पर्धेचे आयोजन करू शकते. म्हणजे आठ संघांची दोन गटात विभागणी केली जाऊ शकते. प्रत्येक गटातील संघ एका शहरात काही सामने खेळतील. पुन्हा दुसऱ्या लेगसाठी दुसऱ्या शहरात जाईल. त्यामुळे खेळाडूंना कमीत कमी प्रवास करावा लागेल आणि कोरोनाच्या धोक्यापासून संरक्षण होईल. सध्या बीसीसीआयने लीगसाठी ५ शहर चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू, दिल्लीची निवड केली आहे. मुंबई बाबत अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. अहमदाबादमध्ये प्लेऑफ आणि अंतिम सामना होऊ शकतो. आयपीएलच्या गव्हर्निंग काौन्सिलची बैठक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक नुकसान ब्रॉडकास्टरचे
अद्याप आयपीएलबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. यंदा लीगचे देशात आयोजन होणार,ही एकच गोष्ट निश्चित आहे. गत सत्र यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. फ्रँचायझी व ब्रॉडकास्टर सध्या स्पर्धेबाबत अंधारात आहेत. ब्रॉडकास्टरला स्पर्धा कधी होणार या बाबत उत्सुकता आहे. कारण, त्यांना ऑन एअर प्रक्षेपणासाठी इन्व्हेंटरीची विक्री करावी लागते. बीसीसीआय संघांची दोन गटांत विभागणी करू शकतो. बीसीसीआय अनेक पर्यायांवर विचार करत आहे. संघाची गटात विभागणी केल्यास सामन्यांची संख्या कमी होईल, त्यामुळे बीसीसीआय, फ्रँचायझी व ब्रॉडकास्टरचे नुकसान होईल. बीसीसीआयने अद्याप फ्रँचायझी व ब्रॉडकास्टरशी आणि प्रायोजकांशी देखील चर्चा केली नाही. आता गव्हर्निंग काौन्सिलच्या बैठकीत याबाबत ठाेस असा निर्णय होण्याची शक्यता आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आयपीएल वेळापत्रक जाहीर
आतापर्यंत आयपीएल ११ एप्रिलला सुरू होईल, असा अंदाज सुरू होता. मात्र, बीसीसीआयने अद्याप तारखेची घोषणा केली नाही. भारत-इंग्लंड कसोटी मालिका ८ मार्च रोजी समाप्त होत असून त्यानंतर कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. प्रक्षेपकांनी विनंती केली की, मंडळाने तयारीसाठी कमीत कमी एक महिन्याचा वेळ द्यावा.

बुमराहची माघार; वनडे मालिकेदरम्यान प्रेक्षकांना बंदी
अहमदाबाद| येत्या ४ मार्चपासून भारत व इंग्लंड चौथ्या कसोटीला सुरुवात हाेणार आहे. या कसाेटीपूर्वी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली. काही खासगी कारणामुळे ताे या कसाेटी सामन्यात खेळू शकणार नाही. अद्याप बीसीसीआयने त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली नाही. तसेच बुमराहची या कसोटीनंतर सुरू हाेणाऱ्या इंग्लंड संघाविरुद्ध टी-२० मालिकेतही निवड झालेली नाही. इंग्लंड संघाचा आॅलराउंडर क्रिस वाेक्स हा नुकताच मायदेशी परतला आहे. रोटेशन पद्धतीमुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

महाराष्ट्रात काेराेनाचा धाेका; प्रेक्षकांना नाे एन्ट्री
महाराष्ट्रामध्ये सध्या काेराेनाचा धाेका वेगाने वाढत आहे. अशात पुण्यात हाेणारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका अडचणीत सापडली. मात्र, आता या मालिकेदरम्यान प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही. अद्याप महाराष्ट्रात स्पोर्ट््स इव्हेंट बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...