आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल 2022 ची सुरुवात 26 मार्चपासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. शुक्रवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये हा निर्णय घेण्यात आला. लीग टप्प्यातील सर्व 70 सामने महाराष्ट्रात खेळवले जातील. 55 सामने मुंबईत तर 15 सामने पुण्यात होणार आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, तर 15 सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. उर्वरित 15 सामने पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. प्लेऑफ सामने कुठे होणार? याबाबत कोणतीही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. सर्व 10 संघ वानखेडे आणि डीवाय पाटील येथे 4-4 सामने खेळतील. याशिवाय त्यांना पुणे आणि ब्रेबॉर्नमध्ये प्रत्येकी तीन सामने खेळावे लागणार आहेत.
10 संघांची 2 ग्रुपमध्ये विभागणी
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सर्व संघांना दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांना ब गटात स्थान मिळाले आहे.
सर्व 10 संघ साखळी टप्प्यात 14-14 सामने खेळतील. सर्व संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. त्याचबरोबर इतर गटातील संघांना प्रत्येकी एक सामना खेळावा लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.