आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022:मुंबईत 55, पुण्यात 15 आणि अहमदाबादमध्ये रंगणार 4 सामने; गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल सीझन 15 चे सामने मुंबई, पुणे आणि अहमदाबाद येथे खेळवले जाऊ शकतात. गुरुवारी होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळू शकते. सर्वाधिक 55 सामने मुंबईत खेळवले जातील, असे मानले जात आहे. 15 सामने पुण्यात तर 4 सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत.

प्ले-ऑफ आणि फायनलचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. या सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत अहमदाबाद आघाडीवर आहे.

मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामने होणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. सर्व 10 संघांचे प्रत्येकी चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होतील. त्याचवेळी ब्रेबॉर्न आणि एमसीए स्टेडियमवर प्रत्येकी तीन सामने होतील. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...