आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या १४ व्या सत्राच्या स्पर्धेला एप्रिलमध्ये सुरुवात हाेणार आहे. जगभरातील गुणवंत खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले. यातील संघांसाठी गुरुवारी लिलाव प्रक्रिया माेठ्या उत्साहात पार पडली. दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस माॅरिसने सर्वांचे लक्ष वेधले. कारण, या ३३ वर्षीय आॅलराउंडरवर राजस्थान राॅयल्स संघाने १६.२५ काेटींची बाेली लावली. ताे लिलावाच्या इतिहासात सर्वात महागडा ठरला. आतापर्यंतच्या आठ सत्रांत दाेन वेळा २०० पेक्षा अधिक धावा काढणारा आॅलराउंडर ग्लेन मॅक्सवेल हा बंगळुरू संघासाेबत १४.२५ काेटी रुपयांत करारबद्ध झाला.
गाैतमला ९ काेटी; बेस प्राइस फक्त २० लाख
कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गाैतम हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.त्याच्यावर चेन्नई संघाने ९.२५ काेटी रुपयांची बाेली लावली. त्याची आधारभूत मूळ किंमत ही फक्त २० लाख हाेती. ताे भारताकडून महागडा खेळाडू ठरला. पंजाबने ऑस्ट्रेलियाच्या अनकॅप्ड मेरिडिथला ८ काेटीत खरेदी केले.
स्मिथ-उमेश यादवचे झाले माेठे नुकसान
गत सत्रात स्मिथ हा राजस्थानसाेबत १२.५ काेटीत करारबद्ध हाेता. आता दिल्लीने त्याला २.२ काेटीत खरेदी केले. मुंबईने कुल्टर नाइलला आठ काेटीत रिलीज करून ५ काेटीत खरेदी केले. गतवेळी ४ काेटी कमाई करणाऱ्या उमेश यादवला १ काेटी मिळाले.
यशस्वी ऑफस्पिनर हरभजनवर दुसऱ्या फेरीत लागली बाेली
चेन्नई सुपरकिंग्ज संघाने रिलीज केलेल्या सर्वात यशस्वी आॅफस्पिनर हरभजनसिंग आणि केदार जाधवला पहिल्या फेरीत माेठा धक्का बसला. कारण, त्यांच्यावर काेणत्याही संघाने बाेली लावली नाही. मात्र, त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये काेलकाता संघाने हरभजनसिंग आणि सनरायझर्स हैदराबाद संघाने महाराष्ट्राच्या केदार जाधववर बाेली लावली. आता हे दाेन्ही क्रिकेटपटू आपापल्या संघासाेबत प्रत्येकी दाेन काेटी रुपयांमध्ये करारबद्ध झाले आहेत. हरभजनसिंग हा आपल्या आयपीएल करिअरमध्ये तिसऱ्या टीमसाेबत करारबद्ध झाला आहे. त्याने चेन्नई व मुंबई इंडियन्सचेही आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले हाेते.
अॅराेन फिंचची निराशा :
आॅस्ट्रेलियन वनडे व टी-२० टीमचा कर्णधार अॅराेन फिंचची या लिलाव प्रक्रियेत निराशा झाली. त्याच्यावर काेणत्याही संघाने बाेली लावली नाही. बिग बॅशमध्ये सर्वाधिक धावा काढणारा अॅलेक्स हेल्सही अनसाेल्ड राहिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.