आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:फेब्रुवारीत आयपीएलची लिलाव प्रक्रिया; यासाठी टी-20 ला पसंती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर बीसीसीआय घरच्या सत्राला सुरुवात करत आहे. टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने १० ते ३१ जानेवारीदरम्यान सहा ठिकाणी होतील. सर्व संघ २ जानेवारीपर्यंत स्पर्धा स्थळी पोहोचतील. बीसीसीआय सचिव जय शहाकडून सर्व राज्य संघटनांना त्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र रणजी ट्रॉफीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी फेब्रुवारीत लिलाव हाेणार आहे. यासाठी टी-२० सामने आयाेजित करण्यावर अधिक भर दिला जात आहे.

सर्व संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की,‘ पाठवलेल्या माहितीच्या आधारे आम्ही घरच्या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. त्याची सुरुवात मुश्ताक अली ट्रॉफीने होईल. रणजी व विजय हजारे ट्रॉफीचा निर्णय स्पर्धेतील साखळी सामन्यानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रियेनुसार घेतला जाईल.’ माहितीनुसार, मंडळाचा मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजनामागे एक उद्देश आहे. आयपीएलची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठी लिलाव प्रक्रिया होऊ शकते. या टी-२० स्पर्धेतून खेळाडूंची ओळख होईल. यंदा लीगमध्ये ९ किंवा १० संघांचा समावेश असेल. यंदा रणजीचे आयोजन कठीण आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser