आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टी-20 लीग:यूएईमध्ये आयपीएल निश्चित; आयाेजन आराखडा दहा दिवसांमध्ये तयार करण्याचे काैन्सिलचे आदेश

मुंबई/दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रजेश पटेल म्हणाले, कोठेही आयोजन होईल, बीसीसीआयला सरकारची परवानगी आवश्यक

टी-२० विश्वचषक स्थगित केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलच्या तयारीला लागले आहे. आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी म्हटले की, पुढील ७ ते १० दिवसांत आम्ही बैठक घेऊन स्पर्धेचा आराखडा तयार करू. कोरोनामुळे टी-२० लीग सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित आहे. ती स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे.

‘७ ते १० दिवसांत एक महत्त्वाची बैठक होईल, ज्यात स्पर्धेचा आराखडा तयार केला जाईल. तारीख, वेळापत्रकासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाईल आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थिती पाहून आयपीएल भारतात आयोजित करायचे की, यूएईला यजमानपद द्यायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयपीएल अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी दिली. दोन्ही परिस्थितीत सरकारची परवानगी मिळणे आवश्यक आहे. सध्या आम्ही संपूर्ण ६० सामन्यांची तयारी करत आहोत, यूएईमध्ये स्पर्धा होऊ शकते, असेही त्यांनी या दरम्यान स्पष्ट केले आहे.

मोटेरा स्टेडियममध्ये सराव

एका फ्रँचायझी संघाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, आमच्या खेळाडूंना कमीत कमी ३ ते ४ आठवडे तयारीसाठी हवे आहेत. बीसीसीआयकडून तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही आपल्या अंतिम योजना बनवू. आम्ही यूएईमध्ये सामने खेळण्यासाठी तयार आहोत. कसोटी स्टार चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी आयपीएलचा भाग नाहीत. ते आयपीएलदरम्यान अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये तयारी करू शकतील. काही इतर खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही जण आयपीएलदरम्यान मोकळे असतील, त्यांच्या सोबत सराव करतील. समालोचक घरूनच काम करू शकतील. पंजाबचे सह मालक नेस वाडियाने म्हटले की, टीव्ही प्रेक्षक यादरम्यान विक्रमी संख्येने वाढू शकतील. मात्र, प्रक्षेपकांना व संघांना सध्याच्या परिस्थितीत प्रायोजक मिळवणे कठीण असेल.

क्वाॅरंटाइनदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना सरावाची उत्तम सुविधा : सीए

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) प्रमुख निक हॉकलेने म्हटले की, भारतीय संघातील खेळाडूंना क्वाॅरंटाइनदरम्यान सरावाची सुविधा मिळेल. टीम इंडियाला डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. संघाला तेथे चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर टीम १४ दिवस क्वॉरंटाइन राहील. मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने खेळाडूंना हॉटलेमध्ये दोन आठवडे क्वाॅरंटाइन ठेवण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. हॉकलेने म्हटले, ‘खेळाडू क्वाॅरंटाइनदरम्यान सराव करू शकतील, ज्याची तयारी केली जात आहे. कारण, त्यातून सामन्याची तयारी करता येईल. त्यासाठी आम्ही आरोग्य तज्ञ आणि संबंधितांचा सल्ला घेत आहोत.’ त्यांनी म्हटले, खेळाडूंना एकतर हॉटेलमध्ये सुविधा दिल्या जातील किंवा स्टेडियमनजीक हॉटेलमध्ये ठेवले जाईल. आम्ही त्याच गोष्टीचा उपयोग करू, ज्यामध्ये खेळाडूंना कमीत कमी धोका राहील. अॅडिलेड, ओव्हलमध्ये हॉटेल आहेत. मात्र, ते मँचेस्टर किंवा साउथम्प्टन सारखे नाहीत. खेळाडू अॅडिलेडमध्ये राहतील, तेथे एका बाजूला हॉटेल आहेत.

बैठकीत या प्रश्नांवर हाेऊ शकतो खल

>  एका दिवसात दोन सामन्यांत वाढ होऊ शकते, सध्या पाच दिवस प्रत्येकी २ सामने खेळवले जातील.

> बीसीसीआयने सर्व संघांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) द्यावी, ज्यामुळे समानता राहील.

>  खेळाच्या पैशातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई बीसीसीआय फ्रँचायझी संघांना करेल?

>  व्हर्च्युअल समालोचन होईल, काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या साॅलिडेरिटी कपदरम्यान घरूनच समालोचन करण्यात आले होते?

> ६ वर्षांनंतर युएईत आयाेजन;२०१४ मध्ये यशस्वी

>  सर्व ६० सामने एकाच ठिकाणी खेळवले जातील