आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काेराेनाने आर्थिक फटका:आयपीएल फ्रँचायझी आता संकटात; नवीन प्रायाेजक शाेधासाठी पेच, गत सत्रात प्रत्येक फ्रँचायझीने केली हाेती 200 काेटींची कमाई

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्पन्नाचे गणित बिघडले; गत सत्रामधील व्हॅल्यूवर केलेली डील अडचणीची

अनेक अडचणींचा सामना करत आता यंदाच्या आयपीएल आयाेजनाचा मार्ग माेकळा झाला. यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून १३ व्या सत्राच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात हाेईल. मात्र, सध्या आयपीएलच्या काही फ्रँचायझींना अनेक संकटांना सामाेरे जावे लागत आहे. या लीगसाठीचे ९५ टक्के कार्यक्रम वेळापत्रक ( इन्व्हेंट्री) या सर्व फ्रँचायझींनी विकले आहेत. त्यामुळे आता आर्थिक अडचणींमुळे या जुन्या व्हॅल्यूनुसारचे डील या सर्व फ्रँचायझींच्या कमाईवर परिणाम करणारे आहे. याशिवाय इन्व्हेंट्री पूर्णपणे विकल्याने आता नव्या प्रायाेजकत्वासाठीचा इतर कंपन्यांसाेबतची डीलही या फ्रँचायझींना करता येत नाही. त्यामुळे लीग आयाेजनाचा तिढा सुटलेला असला तरीही फ्रँचायझी भवतीचा आर्थिक कमाईचा प्रश्न अधिकच बिकट आहे.

यंदा काेराेनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांना माेठा फटका बसला. यात स्पाेर्ट््स इव्हेंटचा समावेश आहे. याच महामारीमुळे आयपीएल आयाेजनावर टांगती तलवार हाेती. अखेर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माेठा निर्णय घेऊन यंदाची आयपीएल थेट दुबईमध्ये आयाेजित करण्याचा निर्णय जाहीर केला.

लाॅकडाऊनने आफ्रिकन खेळाडू मुकणार :
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आता सर्वच देशांच्या खेळाडूंनी आपली अधिकृत अशी प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे न्यूझीलंडपाठाेपाठ दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना आयपीएलमधील सहभागासाठीचे नाहरकत प्रमाणपत्र दिले. मात्र, आफ्रिकन खेळाडूंचा सहभाग अनिश्चित आहे. कारण, याठिकाणी अद्यापही काेराेनाचे संकट कायम आहे. काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन आफ्रिकेमध्ये अद्यापही लाॅकडाऊन कायम ठेवण्यात आलेले आहे. यातून याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही पूर्णपणे लाॅक आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या सहभागाबाबत अद्याप काेणताही निर्णय झालेला नाही. आफ्रिकेचे डिव्हिलियर्स (आरसीबी), क्रिस मॉरिस (आरसीबी), रबाडा (दिल्ली), क्विंटन डिकॉक (मुंबई), स्टेन (आरसीबी), फाफ डुप्लेसिस (सीएसके), इम्रान ताहिर (सीएसके), हार्डस व्हिलजाेएन (पंजाब), मिलर (राजस्थान), एनगिडी (सीएसके) खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी आहेत.