आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:25 सप्टेंबरपासून आयपीएल; दरदिवशी दाेन सामने, पाच मैदानांची झाली निवड

रायपूर (शेखर झा)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 विश्वचषकाच्या निर्णयानंतर बीसीसीआय करेल अधिकृत घाेषणा

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे चालू सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित केले. यादरम्यान बीसीसीआय टी-२० विश्वचषक न झाल्यास आयपीएलच्या आयोजनाची तयारी करेल. माहितीनुसार २५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान त्याचे आयोजन केेले जाऊ शकते. म्हणजे ३६ दिवस स्पर्धा चालेल. प्रत्येक दिवशी २ सामने खेळवले जातील. या सत्रात घरचे मैदान व बाहेरचे मैदान अशी पद्धत नसेल. पाच ठिकाणी सर्व स्पर्धा होऊ शकते. स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी केली जाईल. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. ऑस्ट्रेलियात स्टेडियममध्ये २५ टक्के चाहत्यांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली. विश्वचषक झाले तर, आयपीएल होणार नाही. आयपीएल न झाल्यास मंडळाला जवळपास ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. त्याचप्रमाणे खेळाडूंना देखील कोट्यवधी रुपयांचे वेतन मिळणार नाही.

कोरोना कमी न झाल्यास देशाबाहेर आयोजन

कोरोना व्हायरसमुळे देशातील ठरावीक स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. चाहत्यांच्या उपस्थितीवर अद्याप कोणता निर्णय घेण्यात आला नाही. देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर देशाबाहेर आयोजन केले जाऊ शकते. कोरोनामुक्त देशाला प्राथमिकता दिली जाईल. न्यूझीलंडने आपल्या देशाला कोरोनामुक्त देश घोषित केले आहे. तेथे आणि श्रीलंका व यूएईमध्ये आयोजनावर चर्चा सुरू आहे.

नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत सामने, दुलीप ट्रॉफी

प्रत्येक वर्षी ऑगस्टपासून बीसीसीआय देशांतर्गत स्पर्धेचे आयोजन करतो. मात्र, यंदा नोव्हेंबरमध्ये याच स्पर्धेच्या आयाेजनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे दिवाळीनंतर त्याची सुरुवात होईल. सर्वप्रथम दुलीप ट्रॉफीने सुरुवात होईल. त्यानंतर रणजी, विजय हजारे आणि अखेर सय्यद मुश्ताक अली टी-२० चे सामने खेळवले जातील.

टॉप-4 संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने होतील

आयपीएलमध्ये शक्यतो शनिवार व रविवारीच २-२ सामने खेळवले जात होते. यंदा कमी वेळेत आयोजन करायचे असल्याने प्रत्येक दिवशी २-२ सामने होतील. यंदा प्लेऑफ सारखी पद्धत नसेल. प्लेऑफमध्ये क्वॉलिफायर वन, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर २ असे होते. यंदा लीग सामन्यानंतर अव्वल ४ संघांत उपांत्य सामने खेळवले जातील. मंडळाचा पूर्ण प्रयत्न राहील, विदेशी खेळाडूदेखील लीगमध्ये खेळतील.

बातम्या आणखी आहेत...