आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL Is The Top T20 League In The World In Terms Of Player Performance; 5 League Influence More Than International Matches

क्रिकेट:खेळाडूंच्या कामगिरीच्या बाबतीत आयपीएल जगातील अव्वल टी-२० लीग; ५ लीगचा प्रभाव आंतरराष्ट्रीय सामन्यापेक्षा अधिक

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • क्रिकविझने विविध लीगमध्ये खेळणाऱ्या जगातील ४५०० खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले

टी-२० आज क्रिकेटमधील सर्वात पसंतीचा प्रकार ठरत आहे. जगातील अनेक देशांत टी-२० लीग सुरू झाल्या आहेत. अनेक खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी टी-२० ला प्राधान्य देत आहेत. आयपीएल पैशाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी लीग असून खेळाडूंच्या कामगिरीतदेखील अव्वल लीग ठरते. विस्डेनमध्ये छापलेल्या क्रिकविजचा अहवालात अायपीएलचा प्रभाव जगातील इतर लीगपेक्षा अधिक दिसतो. क्रिकविझने ४५०० खेळाडूंच्या वेगवेगळ्या लीगमधील कामगिरीच्या आधारे अहवाल तयार केला आहे.

खेळाडूंच्या बदलत्या कामगिरीचे विश्लेषण

त्या सर्व खेळाडूंची कामगिरी पाहिली, ज्यांनी जगभरात अनेक लीगमध्ये सहभाग घेतला आणि कामगिरीत कसा बदल झाला. जसे श्रीलंकेतील फलंदाज देशात चांगली कामगिरी करतात, मात्र पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) संघर्ष करताना दिसतात. जर एखादा इंग्लिश गोलंदाज भारतात संघर्ष करत असेल, तर आयपीएलला इंग्लंडच्या लीग टी-२० ब्लास्टमध्ये चांगले मानले जाते.

जगातील टी-२० लीगला या ६ प्रकारे समजा

१. संघांची संख्या : लीगमध्ये जेवढे संघ, तेवढे खेळाडू विभागतात. आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग, बिग बॅशमध्ये ८-८ संघ, द. आफ्रिकन सुपर लीग, पीएसएल, कॅरेबियन लीग व न्यूझीलंडची सुपर स्मॅशमध्ये ६-६ संघ व इंग्लंडच्या टी-२० ब्लास्टमध्ये १८ संघ खेळतात.

२. संघाचा उद्देश : संघ केवळ टी-२० खेळतात, त्यांची कामगिरी चांगली राहते. टी-२० ब्लास्ट व सुपर स्मॅशचे संघ इतर प्रकारात खेळतात.

३. संघ मालक : श्रीमंत संघ चांगल्या खेळाडूंना घेतात. अायपीएल, बांगलादेश, वेस्ट इंडीज व पाक लीगचे मालक श्रीमंत आहेत. इतर लीग फंडवर आधारित आहे.

४. घरचे चांगले खेळाडू : चांगल्या पायाभूत सुविधा आहेत, तेथे चांगले खेळाडू. आपल्या घरच्या मुश्ताक अली लीगमध्ये ३८ संघ खेळतात.

५. चांगले विदेश खेळाडू : आयपीएलमध्ये अधिक पैसा असल्याने चांगल्या खेळाडूंना संधी मिळते. विविध लीगमध्ये एका संघात २ ते ४ विदेश खेळाडू खेळतात.

६. करार : खेळाडूंचा लिलावामुळे आयपीएलमध्ये मूळ किमतीपेक्षा अधिक पैसा मिळतो. इतर लीगमध्ये ड्राफ्टद्वारे पैसे दिले जातात.

विदेशी खेळाडूंमुळे लीग आंतरराष्ट्रीयपेक्षा चांगली

टी-२० लीगचा प्रभाव पाहिला तर आंतरराष्ट्रीयपेक्षा चांगला आहे, कारणे.

> आंतरराष्ट्रीय संघात केवळ स्वत:च्या देशातील खेळाडू असतात. लीगमध्ये जगातील कोणताही खेळाडू खेळू शकतो. हा महत्त्वाचा घटक आहे. जसे पीएसएलमध्ये वेगवान गोलंदाज मिळतात. त्याला पाकच्या वेगवान गोलंदाजांचे केंद्र मानले जाते. फलंदाजी मजबूतीसाठी टीम विदेशी खेळाडूंना घेतात. आंतरराष्ट्रीय संघात असे होत नाही.

> आंतरराष्ट्रीय संघांना टी-२० सह इतर प्रकारच्या क्रिकेटवर लक्ष द्यावे लागते. सर्व प्रकारांसाठी वेगवेगळे खेळाडू असतात. मात्र प्रशिक्षण टीम एकच असते. टी-२० लीगमध्ये संघ केवळ टी-२० वर लक्ष केंद्रित करतो.

बातम्या आणखी आहेत...