आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते आयपीएल, उद्या बैठक : अहवाल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्रीचे सामने भारतीय वेळेनुसार 8 ऐवजी 7.30 वा.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २४ जुलै रोजी होऊ शकते. माध्यमानुसार स्पर्धेबाबत मंडळ लवकरात लवकर नियोजन करू शकते. मात्र, त्यांना अद्याप सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. प्रक्षेपक स्टार इंडिया दिवाळीचा आठवडा सोडू इच्छित नाही. अशात मंडळाने स्टारला पर्याय दिला आहे. स्पर्धा २६ सप्टेंबरऐवजी १९ सप्टेंबर रोजी खेळवली जावी. अशात रात्रीच्या सामन्यात कपात होईल. यात रात्रीचे सामने ८ ऐवजी ७.३० वाजता सुरू होऊ शकतील. मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी ४ वाजेपासून सामना खेळण्यापासून लांब राहू इच्छितात. अशात त्यांच्याकडे पर्याय आहे की, स्पर्धा एक आठवडा आधी सुरू केली जावी हे त्यांना पाहावे लागेल. स्पर्धेचा कार्यक्रम वाढवण्यासाठी त्यांच्याकडून प्रस्ताव आला पाहिजे. आता ४४ दिवसांत ६० सामने खेळवले जातील. त्यासह मंडळाला आयपीएलपूर्वी यूएईमध्ये दक्षिण आफ्रिकेसाेबत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवायची आहे. मात्र, कोरोनामुळे ती मालिका सध्या स्थगित आहे. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही यूएईमध्ये सामने खेळवण्याबाबत दक्षिण आफ्रिका मंडळाशी चर्चा करत आहोत.