आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:आयपीएल आयाेजनाबाबत आज बैठक; अनिश्चित स्थगितच्या निर्णयाची शक्यता!

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे टी-20 लीग अद्याप 15 एप्रिलपर्यंत स्थगित आहे

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सोमवारी आयपीएल बाबत मोठी घोषणा करू शकतो. कोरोना व्हायरसमुळे टी-२० लीग १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. व्हायरसच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नाही. अनेक राज्यांत लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. अशात आयोजन शक्य नाही. गांगुली त्याची अनिश्चित काळासाठी स्थगितीची घोषणा करू शकतो. 

गांगुलीने आयपीएल पुढे वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते का, या प्रश्नावर म्हटले की, “मी सोमवारी बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आयपीएलवर नवीन माहिती देऊ शकेल. जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले अाहे, अशात खेळाचे भविष्य कुठे दिसून येते. कोरोन व्हायरसच्या परिस्थितीवर गांगुलीने म्हटले, हे गंभीर आहे. 

बातम्या आणखी आहेत...