आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:नवे सत्र 10 एप्रिलनंतर; 3 ठिकाणी होणार सामने

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीसीआयने अद्याप आयपीएलच्या १४ व्या सत्राची तारीख घोषित केलेली नाही. माहितीनुसार, टी-२० लीग १० एप्रिलनंतर सुरू होवू शकते. कारण, इंग्लंड संघाचा भारत दौरा २८ मार्च रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर आयपीएलचे आयोजन होईल. इंग्लंडचा २ महिन्यांचा दीर्घ दौरा २८ मार्च रोजी पुण्यातील वनडे सामन्याने समाप्त होईल.

खेळाडू १० दिवसांच्या विश्रांतीनंतर खेळाडू आपापल्या आयपीएल संघात दाखल होतील. महाराष्ट्रात होऊ शकते संपूर्ण सत्र : बीसीसीआय १४ व्या सत्राचे आयोजन देशात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संपूर्ण आयपीएल महाराष्ट्रातील ३ ठिकाणी होवू शकते. मुंबईत २ वानखेडे व ब्रेबोर्न आणि पुणे, नागपूर येथे १-१ आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser