आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. टीम तेथे ३ टी-२० सह वनडे व कसोटी मालिका खेळेल. टी-२० संघात समावेश असलेल्या १६ खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी पाहता कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार लोकेश राहुल दोघांनी संथ खेळी केली. दोघांचा स्ट्राइक रेट करिअरच्या स्ट्राइक रेटपेक्षा कमी राहिला. गोलंदाजीत मो. शमी व दीपक चाहरच्या स्ट्राइक रेटमध्ये वाढ झाली.
> कोहली प्रत्येक १०० चेंडूंवर १७ धावा कमी काढतोय :
कोहलीने लीगच्या १५ सामन्यांत ४२ च्या सरासरीने ४६६ धावा काढल्या. ३ अर्धशतके केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२१ चा राहिला. त्याचा आंतरराष्ट्रीय करिअरचा स्ट्राइक रेट १३८ चा आहे. म्हणजे कोहली प्रत्येक १०० चेंडूंवर १७ धावा कमी काढताेय. सरासरीमध्ये घसरण झाली.
> राहुलने सर्वाधिक धावा काढल्या, खेळ मात्र संथ राहिला :
सलामीवीर व उपकर्णधार लोकेश राहुलने लीगच्या १४ सामन्यांत ५६ च्या सरासरीने सर्वाधिक ६७० धावा काढल्या. १ शतक व ५ अर्धशतके. स्ट्राइक रेट १२९ चा राहिला. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४६ चा राहिला. म्हणजे त्याने धावा खुप काढल्या, खेळ संथ राहिला.
> मयंक अग्रवालने स्वत:ला सलामीवीर म्हणून सिद्ध केले :
मयंक अग्रवाल पहिल्यांदा आॅस्ट्रेलियात टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. लीगच्या ११ सामन्यांत त्याने ३९ च्या सरासरीने ४२४ धावा काढल्या. १ शतक व २ अर्धशतके केली. स्ट्राइक रेटदेखील १५६ चा राहिला. त्याने एकूण टी-२० करिअरमध्ये १४७ सामन्यांत २६ च्या सरासरीने ३३९३ धावा काढल्या आहेत.
> धवनची २ शतके, ४ वेळा शून्यावर बाद :
सलामीवीर शिखर धवनने लीगच्या १७ सामन्यांत ४४ च्या सरासरीने ६१८ धावा काढल्या. २ शतके काढणारा एकमेव फलंदाज. ४ अर्धशतके ठोकली. मात्र, कामगिरीत खूप चढ-उतार राहिला. लीगमध्ये तो ४ वेळा शून्यावर बाद झाला.
> अय्यरने स्वत:ला मधल्या फळीत स्थिर केले :
श्रेयस अय्यरने लीगमध्ये १७ सामन्यांत ३५ च्या सरासरीने ५१९ धावा काढल्या. ३ अर्धशतके लगावली. वनडेनंतर अय्यरने स्वत:ला टी-२० मध्ये मधल्या फळीत स्थिर केले. अय्यरची २२ टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये २ अर्धशतके.
> मनीष पांडेमध्ये सातत्याचा अभाव :
मनीष पांडेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. लीगच्या १६ सामन्यांत ३३ च्या सरासरीने ४२५ धावा काढल्या. ३ अर्धशतके. क्षेत्ररक्षणात अनेक झेल सोडले. टी-२० च्या ३८ आंतरराष्ट्रीय लढतीत ३ अर्धशतकांसह ७०७ धावा केल्या.
> हार्दिक पांड्याची बॅट चालली, गोलंदाजीबाबत संशय :
हार्दिकने लीगच्या १४ सामन्यांत ३५ च्या सरासरीने २८१ धावा केल्या. १ अर्धशतक. स्ट्राइक रेट १८० चा राहिला. २५ षटकार ठोकले. मात्र, गोलंदाजीत एकही चेंडू टाकला नाही. हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.
> सॅमसनची पहिल्या २ सामन्यांत २ अर्धशतके, त्यानंतर १२ सामन्यांत केवळ एक :
यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनची पहिल्या २ सामन्यांत २ अर्धशतके. त्यानंतर १२ सामन्यांत केवळ एकच. त्याने ३ अर्धशतकांसह ३७५ धावा काढल्या. २६ षटकार ठोकले. कामगिरीत चढ-उतार राहिला. एकूण टी-२० च्या १६३ सामन्यांत २ शतके व २४ अर्धशतके.
> शमीने नव्या चेंडूवर बळी घेतले, महागडा ठरला :
वेगवान गोलंदाज मो. शमीने लीगच्या १४ सामन्यांत २३ च्या सरासरीने २० गडी टिपले. इकॉनॉमी ८.५७ व स्ट्राइक रेट १६.१ चा राहिला. नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली. टी-२० च्या ११ आंतरराष्ट्रीय सामन्यात १२ बळी. स्ट्राइक रेट १९.८ राहिला.
> दीपक चाहरचे सरासरी प्रदर्शन, इकॉनॉमी खराब :
वेगवान गोलंदाज दीपक चाहर यंदाच्या सत्रात विशेष कामगिरी करू शकला नाही. १४ सामन्यांत ३३ च्या सरासरीने १२ बळी घेतले. इकॉनॉमी ७.६१ राहिली. टी-२० च्या १० आंतरराष्ट्रीय लढतीत १५ च्या सरासरीने १७ बळी घेतले आहेत.
> नटराजन यॉर्कर किंग ठरला, आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी :
वेगवान गोलंदाज टी. नटराजनने लीगमध्ये सर्वाधिक यॉर्कर चेंडू टाकले. १६ सामन्यांत १६ बळी घेतले. इकॉनॉमी ८.०२ व स्ट्राइक रेट २३.५ राहिला. आता आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो.
> सैनीने स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली :
वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने लीगच्या चालू सत्रात सरासरी प्रदर्शन केले. त्याचे १३ सामन्यांत ६ बळी. इकॉनॉमी ८.२९ राहिली. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी व वेगामुळे संघात स्थान मिळाले.
> अष्टपैलू जडेजाच्या चेंडू व बॅट दोन्हीची कामगिरी चांगली :
डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचे लीगमध्ये १४ सामन्यांत ६ बळी. इकॉनॉमी ८.७५ व स्ट्राइक रेट ३६.३ चा राहिला. फलंदाजीत एका अर्धशतकासह २३२ धावा केल्या. टी-२० मध्ये ४९ आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव आहे.
> वॉशिंग्टन सर्वात कंजूष भारतीय गोलंदाज ठरला :
ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर लीगमधील सर्वात कंजूष भारतीय गोलंदाज ठरला. १५ सामन्यांत ८ बळी घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.