आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL Player Sandeep Lamichhane To Surrender: 17 year old Minor Girl Accused Of Rape, Former Nepal Captain

IPL खेळलेला संदीप लामिछाने करणार आत्मसमर्पण:17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बलात्काराचा आरोप, नेपाळ टीमचा होता कर्णधार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ क्रिकेट टीमचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आत्मसमर्पन करणार असल्याचे सांगीतले. संदीप हा 6 ऑक्टोबर रोजी नेपाळला पोहोचणार आहे.

लामिछाने याच्यावर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीने तक्रार केल्यानंतर संदीप हा देशाबाहेर असल्यामुळे पोलिसांना त्यावर काहीही कारवाई करता आली नव्हती.आता मात्र संदीपने नेपाळला परतण्याचा निर्णय घेतला आहे.

संदीपने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'खूप आशा आणि ताकदीसह, मी पुष्टी करतो की मी 6 ऑक्टोबर 2022 रोजी माझ्या देशात नेपाळला पोहोचेन आणि नेपाळ ऑथोरिटीला स्वता:ला स्वाधीन करेन आणि माझ्यावर लावलेल्या खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढेन.

मी येथे पुन्हा पुन्हा सांगतो की मी निर्दोष आहे आणि माझ्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा देशाच्या कायदा अंमलबजावणी प्राधिकरणावर, माननीय न्यायालयावर आणि त्यांच्या न्याय्य खटल्यावर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. मला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा आहे.

माझ्या प्रिय शुभचिंतकांनो, मी तुम्हाला खात्री देतो की मी निर्दोष आहे आणि मी तुम्हाला चुकीचे सिद्ध केलेले नाही. मी या वाईट परिस्थितीतून आता सावरलो आहे आणि स्वत:ला एका षडयंत्राचा बळी आणि या आरोपातून निर्दोष सिद्ध करण्यासाठी या अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. माझ्यावरील सर्व खोट्या आरोपांची सत्यता कालांतराने बाहेर येईल, अशी मला खात्री आहे.'

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्याच्यावर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडू येथे वैद्यकीय तपासणीनंतर लामिछाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी लामिछाने हा नेपाळकडून केनियात क्रिकेट खेळत होता. 22 वर्षीय लामिछाने हा IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.

नेपाळ पोलिसांनी घेतली इंटरपोलची मदत

नेपाळ पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने नेपाळचा माजी क्रिकेटपटू संदीप लामिछाने यांच्याविरुद्ध डिफ्यूजन नोटीसही जारी केली होती. तक्रार दाखल झाल्यापासून संदीपबाबत कोणतीही माहिती समोर येत नव्हती आणि तो फरार घोषीत होता.

IPL मध्ये घेतल्या आहेत 13 विकेट

संदीप हा लेगस्पिनर आहे. IPL खेळणारा तो नेपाळचा पहिला खेळाडू होता. लामिछानेने IPL च्या 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. लामिछानेने 2018 साली दिल्लीकडून इंडियन लीगमध्ये पदार्पण केले.

उजव्या हाताचा हा गोलंदाज बेस किंमतीला म्हणजे 20 लाखांना विकला गेला. 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये संदीपने चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी नेपाळची टीम ही वर्ल्ड कप मध्ये 8व्या क्रमांकावर होती.

4 वर्षांच्या इंटरनॅशनल कारकिर्दीत 23 संघांसाठी खेळला आहे

संदीप त्याच्या 4 वर्षांच्या इंटरनॅशनल कारकिर्दीत 23 संघांसाठी खेळला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियाच्या लीग व्यतिरिक्त जगभरातील लीगमध्ये तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

संदीपने नेपाळकडून आतापर्यंत 30 वनडे आणि 44 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 30 वनडे सामन्यांमध्ये 69 आणि 44 टी-20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 85 बळी आहेत.

136 T-20 सामन्यामध्ये 193 विकेट घेतल्या

वेगवेगळ्या लीग आणि टूर्नामेंटमध्ये, संदीपने जगभरातील लीगमध्ये एकूण 136 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 193 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन आणि लिस्ट-ए मध्ये 115 विकेट्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...