आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीसीसीआयचे काउन्सेलर प्रभतेजसिंग भाटिया म्हणाले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होऊ शकते. बीसीसीआय त्याच्या आयोजनासाठी पूर्ण प्रयत्नात आहे. २९ मार्चपासून आयपीएल सुरू होणार होते. मात्र कोराेनामुळे त्याला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
प्रभतेज म्हणाले की, “आयपीएलच्या आयोजनामुळे केवळ संघ आणि खेळाडूंचा फायदा होईल असे नाही, उत्पन्नाचे होणारे मोठे नुकसानदेखील वाचेल. प्रत्येक वर्षीप्रमाणे आयपीएल झाले तर भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूदेखील सामन्यात खेळतील.’
ऑक्टोबर-नोव्हेंबरला आयपीएल होत होणार असेल तर अशा परिस्थितीत विदेशी खेळाडू येण्यावर कोणता ना कोणता निर्णय घेतला जाईल. कोरोना व्हायरसमुळे जवळपास दोन महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. आंतरराष्ट्रीय व स्थानिक दोन्ही खेळाडू आपल्या घरात बंद आहेत. सरावदेखील पूर्णपणे बंद आहे, असेही ते म्हणाले.
विश्वचषकाचा निर्णय १० जूनला; टीम इंडियाचे ९९ दिवसांच्या ऑस्ट्रेलियन दाैऱ्यात १० सामने
दुबई । ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक आयाेजनाचा निर्णय आता १० जुनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला. यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे आता भारताचा संघ तीन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी दाैरा करणार आहे. भारताचा संघ ऑक्टेबरमध्ये ऑस्ट्रेलिया दाैऱ्यावर रवाना हाेईल. या ९९ दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात संघ एकूण १० सामने खेळेल. हा दाैरा साधारणपणे ११ ऑक्टाेबरपासून १७ जानेवारी २०२१ पर्यंत असणार आहे. ११ ते १७ ऑक्टाेबरमध्ये या दाेन्ही संघांत तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ११ ऑक्टाेबरला गाबाच्या मैदानावर सलामी सामना खेळवला जाईल. १४ ऑक्टाेबरला मनुका आेव्हलवर दुसरा व १७ ऑक्टाेबरला तिसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.