आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL | Session 15 | India | 15th Season From April 2, 10 Teams Instead Of 8 In This Year's IPL; All 74 Matches Are In India

पाच महिन्यात IPLचे नवीन सीझन:15 वा सीझन 2 एप्रिलपासून, यंदाच्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम; सर्व 74 सामने भारतातच

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या सीझनचे शेड्यूल तयार केले आहे. सध्या मात्र बोर्डाकडून कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसून, मात्र सर्व फ्रँचायझींना सांगण्यात आले आहे की, पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळला जाऊ शकतो.

सीझन-14 चा जो कोणी विजेता असेल तो, सीझन-5 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जशी खेळणार असल्याचे देखील निश्चित करण्यात आले आहे. बीसीसीआयने यापूर्वीच अशी घोषणा केली आहे की, यंदाचे आयपीएलचे सर्व सामने भारतातच खेळले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आयपीएलचा 14 वा सीझनचे आयोजन दुबईत करण्यात आले होते.

10 संघ असणार
क्रिकबझ या वेबसाइटने सांगितले की, अंतिम सामना 4 किंवा 5 जून रोजी खेळवला जाऊ शकतो.
यावेळी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ सामन्या खेळण्यासाठी उतरतील.
2 नवीन संघांची भर पडल्याने सामन्यांची संख्या वाढली आहे. आता 60 ऐवजी 74 सामने होतील.
सर्व संघांना पूर्वीप्रमाणे 14-14 सामने खेळावे लागतील. 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने घराबाहेर.

डिसेंबरमध्ये होणार लिलाव
पुढील हंगामाचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार असून, त्याची तारीख मात्र अजून ठरवण्यात आली नाही. आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ असणार असून, त्यात लखनौ आणि अहमदाबादच्या रूपाने दोन नवीन संघ सामील झाले आहेत. आरपी संजीव गोयंका या ग्रुपने 7,090 कोटी रुपयांमध्ये लखनौ संघ विकत घेतला आहे. त्याचवेळी सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ 5200 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. बीसीसीआयने दोन्ही संघांकडून 12 हजार कोटींची कमाई केली आहे, जी अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे.

भारतात आयपीएल घोषणा
आयपीएलचे पुढचे सीझन हे भारतातच खेळले जाणार अशी घोषणा यापूर्वीच बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी केली होती. आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये चेन्नई संघ जिंकल्यानंतर शाह यांनी सांगितले होते की, "मला माहित आहे की तुम्हा सर्वांना चेपक स्टेटीअममध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळ पाहायचा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ती संधी फार दूर नाही. पुढचा हंगाम भारतात होणार आहे. त्यात दोन नवीन संघ सामील होत आहेत. नवीन संयोजन कसे तयार होते ते पाहूया." अशी घोषणा शाह यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...