आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Irfan Pathan Said If There Is Anyone Who Can Break Legendary Sachin Tendulkar’s Feat Of Scoring 100 International Hundreds, Then It Has To Current India Captain Virat Kohli

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शतकांचे शतक:विराट मोडू शकतो सचिनच्या शतकांच्या शतकाचा रेकॉर्ड; इरफान पठाण म्हणे- विराटमध्ये फिटनेस आणि क्षमता दोन्ही गोष्टी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराटचे आधीच 70 शतक पूर्ण, रिटायरमेंटपूर्वी विराट नक्कीच मोडू शकतो सचिनचा विक्रम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच सचिनच्या शतकांच्या शतकाचा रेकॉर्ड मोडू शकतो असे माजी ऑलराउंडर इरफान पठाणने म्हटले आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी फिटनेस आणि क्षमता या दोन्ही गोष्टी विराटमध्ये आहेत. पठाणने स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये आपले मत मांडले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सचिन तेंडुलकरने मार्च 2012 मध्ये आशिया चषकात बांग्लादेशविरुद्ध खेळताना आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचा शंभरावा शतक ठोकले होते. त्याच्या वनडे इंटरॅशनल करिअरचे हे 49 वे शतक होते.

रिटायरमेंटपूर्वी विराट नक्कीच मोडू शकतो सचिनचा विक्रम

पठाण पुढे बोलताना म्हणाला, मला तर नेहमीच वाटते की सचिनचा विक्रम एखाद्या भारतीय खेळाडूनेच मोडावा आणि तो विराट करू शकतो. कारण, त्याने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय शतकांचा आकडा पूर्ण केला आहे. (यातील 43 एकदिवसीय सामन्यांतील तर 27 टेस्ट सामन्यांतील आहेत.) मला वाटते की विराट रिटार होण्यापूर्वीच नक्कीच हा विक्रम मोडू शकतो.

कोहलीने नुकतेच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची 12 वर्षे पूर्ण केली आहेत. तो 31 वर्षांचा आहे. सध्याची त्याची फिटनेस आणि फॉर्म पाहता तो आणखी 7-8 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. मला विश्वास आहे की विराटच्या डोक्यात 100 शतक वगैरे काहीच नसेल. पण, सर्वांना माहिती आहे की तेंडुलकरनंतर एखादा फलंदाज हा विक्रम करू शकतो तो विराट कोहलीच आहे.

विराटने 334 सामने खेळून ठोकले 70 शतक

सचिन तेंडुलकरने 100 आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्यासाठी एकूण 663 सामने खेळले. यात 463 वनडे आणि 200 टेस्टचा समावेश आहे. तर विराट कोहलीची खेळी पाहता त्याने अवघ्या 334 सामन्यांत (248 वनडे, 86 टेस्ट) 70 शतक केले आहेत. विराटने टेस्टमध्ये 27 आणि वनडेमध्ये 43 शतक ठोकले. तर तेंडुलकरने टेस्टमध्ये 51 आणि वनडेमध्ये 49 शतक ठोकले. एकूण धावांबद्दल बोलावयाचे झाल्यास सचिनने टेस्ट सामन्यांत 15921 आणि वनडेमध्ये 18426 धावा काढल्या. तर विराट कोहलीने टेस्टमध्ये 7240 आणि वनडेमध्ये 11867 धावा काढल्या आहेत. कोहली सध्या आयपीएल खेळण्यासाठी यूएईमध्ये आहे. तो वर्षांच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यानंतर पहिलाच टूर्नामेंट खेळत आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणारे आयपीएल 10 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.