आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Irritated At The Loss Of The Service Game, Yakovic Hit The Ball To Line Judge; Expulsion By Umpires;

टेनिस:सर्व्हिस गेम गमावताच चिडलेल्या याेकाेविकने खिशातील चेंडू लाइन जजला केला हिट; पंचांनी केली हकालपट्टी; 1.8 कोटींचा बसला फटका

न्यूयॉर्क19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बक्षिसाच्या रकमेत कपात; रँकिंग पॉइंटलाही फटका

नंबर वन नाेवाक याेकाेविकला अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेतील गैरवर्तन महागात पडले. स्पेनच्या बुस्ताविरुद्ध लढतीत सर्व्हिस गेम गमावल्याचे जिव्हारी लागल्याने त्याने खिशातील चेंडू काेर्टच्या बॅकसाइडवर मारला. यासह हा वेगवान चेंडू ४० फूट अंतरावरील लाइन जजला लागला. त्यामुळे महिला जज जमिनीवरच खाली बसली. या वेळी हे गैरवर्तन अधिक चुकीचे ठरल्याचे याेकाेविकच्या लक्षात आले. यासह त्याने स्वत: जाऊन महिला पंचांची चाैकशी केली. मात्र, त्याला या गैरवर्तनाचा माेठा फटका बसला. ताे पहिल्या सेटमध्ये ५-६ ने पिछाडीवर हाेता. आता त्याची विजयी माेहिम ब्रेक झाली आहे.

दाेन पंचांनी सखाेल चर्चा केली आणि याप्रकरणी नाेवाक याेकाेविकला अपात्र ठरवण्याचा निर्णय जाहीर केला. यातून याेकाेविकला हा सामना अर्ध्यावर साेडून स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्यामुळे गैरवर्तनाने अपात्र म्हणून ग्रँडस्लॅम स्पर्धेतून बाहेर पडावे लागणारा याेकाेविक हा जगातील एकमेव नंबर वन टेनिसपटू ठरला. याशिवाय पहिल्यांदाच अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेत हा प्रकार घडला. यातून त्याला १.८ काेटी रुपयांचा माेठा फटका बसला आहे.

१५ लाखांची दंडात्मक कारवाई :

याेकाेविकवर यातुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. सामन्यादरम्यान खेळताना आॅफिशियलला दुखापत करणाऱ्या खेळाडूंवर अशी कारवाई करण्याचा नियम आहे. यातून याेकाेविकला याप्रकरणी १२ लाखांचा दंड ठाेठावण्यात आला. तसेच त्याच्या बक्षिसाच्या रकमेत कपात झाली. याचा माेठा परिणाम त्याच्या रँकिंग पॉइंटवरही पडणार आहे.

यूएस ओपन: २०१६ नंतर पहिल्यांदाच नवा चॅम्पियन मिळणार

पुरुष एकेरीत नवख्या खेळाडूंवर ट्राॅफीची मदार

नाेवाक याेकाेविकला गैरवर्तनामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे आता पहिल्यांदा या स्पर्धेत एकही ग्रँडस्लॅम खेळाडू उरला नाही. नवख्या खेळाडूंवरच आता ट्राॅफीची मदार असणार आहे. यातून नवा चॅम्पियन यंदा मिळणार आहे.

याेकाेविक म्हणाला- आय अॅम सॉरी

या घटनेमुळे मी फारच दु:खी झालाे आहे. मात्र, आता त्यांची तब्येत चांगली आहे. या सर्व प्रकारामुळे मी त्याची माफी मागताे. - नोवाक याेकाेविक, सर्बिया

शापाेवालाेव अंतिम आठमध्ये दाखल; पहिला कॅनडियन

कॅनडाच्या शापाेवालाेवने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने डेव्हिड गाेफिनवर मात केली. त्याने ६-७, ६-३, ६-४, ६-३ ने सामना जिंकला. यासह ताे क्वार्टर फायनल गाठणारा पहिला कॅनडियन टेनिसपटू ठरला.

हे पाच खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेतून डिस्क्वालिफाय

टेनिसपटू ग्रंॅडस्लॅम (वर्ष)

स्टीफन कोबेक फ्रेंच ओपन (2000)

जेफ तरांगो विंबलडन (1995)

कार्सटन एरियंस फ्रेंच ओपन (1995)

टिम हॅनमेन विंबलडन (1995)

जॉन मॅकनराे ऑस्ट्रेलियन ओपन (1990)