आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ishan Kishan In Hospital Lahiru Kumara Viral Video Dharamshala T 20 | Bouncer Hits Ishaan Kishan's Head; The Wrong Knock Of Heart | Marathi News |

बाउन्सरनंतर ईशान रुग्णालयात दाखल:भयंकर! ईशान किशनच्या डोक्याला लागला बॉउन्सर; काळजाचा चुकला ठोका

धर्मशाला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा सलामी फलंदाज ईशान किशनची फलंदाजी श्रीलंकेविरोधात खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात कमालीची ठरली नाही. ईशान किशन अवघ्या 16 धावा करुन बाद झाला. ईशानच्या खेळीदरम्यान, 3.2 षटकांमध्ये, लाहिरू कुमारने 146 किमी प्रतितास वेगाने एक वेगवान बाउन्सर टाकला जो इशानच्या डोक्याला लागला. त्यानंतर ईशान हेल्मेट काढून जागेवर खाली बसला. यानंतरही इशानने फलंदाजी केली. आऊट झाल्यानंतर मात्र इशानला तातडीने कांगड़ा येथील रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. सुरुवातीला त्याला आयीयूत ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याला जनरल वॉर्डात भरती करण्यात आले आहे.

चेंडू लागल्यानंतरही फलंदाजी
ईशानला डोक्यावर चेंडू लागला, त्यानंतर तो हेल्मेट काढून जागेवरच खाली बसला होता. त्यानंतर अनेकांना वाटले की, ईशान खेळू शकणार नाही. मात्र, त्याने आपली फलंदाजी कायम ठेवली. परंतू ईशानची खेळी जास्त काळ टिकू शकली नाही. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूंत लाहिरूने ईशानला बाद केले. किशनने 15 चेंडूत फक्त 16 धावा काढल्या आहेत.

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात दुष्मंता चमीराने कर्णधार रोहित शर्माला (1) बोल्ड केले. गेल्या सामन्याचा हिरो ईशान किशन लाहिरू कुमाराच्या चेंडूवर 16 धावा काढून बाद झाला, मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 25 चेंडूत 39 धावा केल्या आणि त्याला बिनरा फर्नांडोने बाद केले.

सॅमसन बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरला आणि दोघांनी चौथ्या विकेटसाठी 26 चेंडूंत नाबाद 58 धावा करत भारताला सामना मिळवून दिला. जडेजा मैदानावर येताच त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. त्याने 18 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. श्रेयसनेही 44 चेंडूत 74 धावांची नाबाद खेळी खेळली.

बातम्या आणखी आहेत...